बुलढाणा,
खामगांव येथील श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदी Eknath Shinde अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी प्रथम श्री जगदंबा मातेचे दर्शन घेवून पूजन केले. तसेच जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी संस्थांनच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी Eknath Shinde मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायांशी संवाद साधला.
खामगांवमधील घाटपुरी येथील श्री.जय जगदंबा माता संस्थान येथे आयोजित या भूमिपूजन समारंभास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, संस्थानाचे अध्यक्ष पंकज केला, उपाध्यक्ष कृष्णकुमार भट्टड, संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.