आरमोरी येथे मैचल चंडिमाता मंदिराची प्रतिकृती

Gadchiroli-Armori-Durga Utsav खल्लारी माता मंदिराची प्रतिकृती

    दिनांक :03-Oct-2024
Total Views |
नवरात्रोत्सव विशेष 
- प्रा. दौलत धोटे 
 
 
Gadchiroli-Armori-Durga Utsav संपूर्ण विदर्भातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणारा नवरात्र उत्सव सोहळा हा आरमोरी शहरात गेल्या 85 वर्षांची परंपरा लाभलेला असून, यावर्षी या नवरात्र उत्सवासाठी नवदुर्गा उत्सव मंडळ मोटर स्टॅन्ड आरमोरी यांच्या मंदिरामध्ये जम्मू काश्मीर येथील किश्तवाड जिल्ह्यातील मंचल येथील मैंचल चंडी माता मंदिरासह आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथील कन्यका माता मंदिराची भव्य दिव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. Gadchiroli-Armori-Durga Utsav सोबतच टिळक चौक दुर्गा माता मंदिर आरमोरी या मंडळाच्या वतीने, छत्तीसगड मधील खल्लारी माता मंदिर आणि भीम खोच पहाडी शेर गुफा अशा इत्यादी प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्यामुळे, हा नवरात्र उत्सव याची तयारी पूर्ण होत असून येत्या तीन ऑक्टोबरला विलोभनीय दृश्य आपल्याला आरमोरी शहरात पाहायला मिळणार आहे. 
 
 
 
 
Gadchiroli-Armori-Durga Utsav
 
 
यंदाच्या दुर्गा उत्सवात अनेक प्रतिकृती भाविकांसाठी आकर्षक ठरणार आहे. टिळक चौकातील दुर्गा मंदिर रामसागर तलावाच्या काठावर असून ते जागृत देवस्थान आहे. येथील दुर्गामाता मातेच्या प्रतिकृतीची 85 वर्षाची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. Gadchiroli-Armori-Durga Utsav येथील नवरात्र उत्सवात अनेक जाती-धर्माची लोक एकत्र येऊन भक्ती भवानी देवीची आराधना करतात. सार्वजनिक दुर्गा माता देवस्थानचे पदाधिकारी गेल्या 45 वर्षापासून निरनिराळ्या राज्यातील प्रसिद्ध प्रतिकृती उभारतात. त्यामुळे, दरवर्षी प्रत्येक प्रतिकृतीत वेगवेगळे आकर्षण असते. यावर्षी दुर्गा माता देवस्थानचे पदाधिकारी खल्लारी माता मंदिराची प्रतिकृती व विविध देखावे साकारत असून ही प्रतिकृती 12000 स्क्वेअर फुटामध्ये असून त्यांची उंची ही 35 फूट आहे. ही संपूर्ण प्रतिकृती रामसागर तलावाच्या पायथ्याशी तयार होत आहे. मंडळाचे पदाधिकारी व सदस्य नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. प्रामुख्याने, टिळक चौकातील या प्रतिकृतीमध्ये यावर्षी खल्लारी माता मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत असून सर्वप्रथम भाविक भक्तांना खल्लारी माता मंदिराच्या स्वागत गेटमधून पुढे गेल्यावर प्रेक्षणीय भिमकोच पहाडी बघायला मिळणार आहे.
 
 
 
Gadchiroli-Armori-Durga Utsav त्यानंतर, भाविकांना या पहाडी मधून दंतेश्वरी गुफेतून मार्गक्रमण करून शेर गुहेत प्रवेश करायला मिळणार आहे. यानंतर डोंगर पायथ्याशी भागीरथी बटुक भैरव, गणपती बाप्पा ,शापित बंजारा मा ,अन्नपूर्णा देवी यांचे दर्शन होणार आहे. पुढे गेल्यानंतर बजरंग बली यांच्या वेगवेगळ्या अवतारातील प्रतिकृती पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर महर्षी वेद व्यास यांचे दर्शन मा खल्लारी मातेचे दर्शन भाविकांना होणार आहे जवळपास ही प्रतिकृती तयार करण्यासाठी 25 ते 30 कारागीर व्यस्त असून हे प्रतिकृतीचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. ही प्रतिकृती कारागीर शंकर सातव ,गणेश वनवे, रेवती मने यांच्या कलाकृतीतून साकारण्यात येत आहे. या प्रतिकृतीचे काम गतीने सुरूअसून यासाठी 25 ते 30 मजूर अहोरात्र काम करीत आहेत. Gadchiroli-Armori-Durga Utsav त्याचप्रमाणे, नवदुर्गा उत्सव मंडळ मोटार स्टॅन्ड आरमोरी या ठिकाणी यावर्षी जम्मू काश्मीर येथील किश्तवाड जिल्ह्यातील मचेला येथील मैचल चंडी माता मंदिरासह आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथील कनयका माता मंदिराची भव्य दिव्य प्रतिकृती साकारण्यात येत आहे. परिणामी, जिल्ह्यातील नव्हे तर विदर्भातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांसाठी सदर प्रतिकृतीची आकर्षण केंद्र ठरणार आहे. नवदुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी मागील गेल्या 45 वर्षापासून निरनिराळ्या राज्याच्या प्रतिकृती उभारतात.
 
 
 
त्यामुळे, दरवर्षी प्रत्येक प्रतिकृतीत वेगवेगळी आकर्षण असतात. येथील, नवरात्र उत्सव बघण्यासाठी विदर्भासह राज्यातील अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येत असतात. यावर्षी, या काल्पनिक मंदिराची प्रतिकृती दहा दहा हजार स्क्वेअर फूटमध्ये उभारली जाणार असून तिची उंची जवळपास 50 फूट एवढी आहे. Gadchiroli-Armori-Durga Utsav आत्तापर्यंत, आरमोरी शहरात बनलेल्या इतर मंदिराच्या प्रतिकृतीपेक्षा ही प्रतिकृती आकाराने, विस्ताराने सर्वात मोठी असणार आहे. यापूर्वी, या नवदुर्गा उत्सव मंडळाने वैष्णोदेवी, बमलेश्वरी, अमरनाथ, पंचतत्व, शेगाव, शिर्डी, महल, पाताल भैरवी, पद्मनाभन, चारधाम द्वारका, वृंदावन, अष्टविनायक, सर्वधर्मसमभाव, तिरुपती बालाजी, अक्कलकोट आदींसह अनेक प्रतिकृती साकारल्या आहेत. यावर्षी या मंदिराची प्रतिकृती तीन मजल्याची असून भाविक भक्तांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ पहाडीतून आतमध्ये प्रवेश करावा लागणार आहे. त्यानंतर, भाविकांना कनक दुर्गा मातेचे दर्शन होणार आहे. पुढे भाविकांना बर्फाच्छादित भागातून मार्ग काढीत चंडी माता मंदिराचे व मातेचे दर्शन होणार आहे.
 
 
 
Gadchiroli-Armori-Durga Utsav शेवटी दुर्गा मातेचे भव्य दर्शन होणार आहे शेवटी दुर्गामातेच्या भव्य दरबार बघायला मिळणार आहे ज्या दुर्गा भवानी माता महिषासुर राक्षसाचा वध करताना दिसणार आहे सदर प्रतिकृती भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत कोलकत्याचे आर्किटेकार आणि मंडळासह 25 ते 30 मजूर हा प्रतिकृती तयार करण्यासाठी व्यस्त असून काम हे अंतिम टप्प्यात आलेले आहेत. विदर्भासह राज्यातून अनेक भाविक भक्त हा मनोहरी दृश्य बघण्यासाठी या आरमोरी शहरांमध्ये दरवर्षी अलोट अशी गर्दी दिसणार आहे. सदर नवरात्र उत्सव दरम्यान पोलीस विभाग यांच्या वतीने सुद्धा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. Gadchiroli-Armori-Durga Utsav दरवर्षी आरमोरी शहरांमध्ये मेला सुद्धा मोठ्या प्रमाणात भरत असल्याने जवळपास नवरात्र उत्सवादरम्यान मेल्या मधील गर्दी पाहता आरमोरी येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या माध्यमातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण पोलीस स्टेशनची बंदोबस्त योग्य प्रकारे वाटप करीत असते. आजपर्यंतच्या इतिहासात आर्मूर येथील नवरात्र उत्सवाला कोणत्याच प्रकारची गालबोट लागलेले नाही हे विशेष !