धर्म, संस्कृतीसाठी हिंदूंनी एकगठ्ठा मतदान करावे

अजित चव्हाण यांचे आवाहन

    दिनांक :03-Oct-2024
Total Views |
विदर्भ चेंबरऑफ कॉमर्सच्या सभागृहात पुस्तकांचे प्रकाशन
संस्कृती संवर्धन समिती आणि सनातन धर्मसभा पुस्तकालयाचा उपक्रम
अकोला :
Ajit Chavan केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार हे या देशावर कलंक असलेले अनेक कायदे बदलून समस्त भारतीयांना विदेशी गुप्त षडयंत्रांच्या श्रृंखलेतून मुक्त करीत आहे. काँग्रेसने व तुष्टीकरणवादी पक्षांनी हिंदू समाजाला विदर्मीयांच्या कचाट्यात राहील असे कायदे लादलेले आहेत.आता सरकारच्या हे लक्षात आल्याने मोदी सरकार ते गुलामीचे कायदे रद्द करून भारताला विकासाच्या मार्गावर आणि स्वाभिमानाच्या दिशेने नेत आहेत म्हणून तुष्टीकरणवाद्यांच्या पोटात गोळा उठला असून ते देशातील जनतेला भ्रमित करीत आहेत.याचे प्रत्यंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले असून विशिष्ट समाजातील लोकांनी एकगठ्ठा मतदान केले.हे मतदान त्यांनी हिंदू विरोधात केले आहे.याची जाण विदर्भातील समस्त नागरिकांनी ठेवून येत्या विधानसभा निवडणुकीत हिंदूंनी घराबाहेर पडून एकगठ्ठा मतदान देश, संस्कृतीचे रक्षण करणार्‍या पक्षाला करावे असे आवाहन भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केले.
 

ajit chavhan 
 
येथील विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात विकसित महाराष्ट्र, नवे फौजदारी कायदे व वफ्फ बोर्ड एक गठ्ठा मतदानाचा लढा, निर्मलवारी अभियान आणि बदलती मुंबई अतिसुरक्षेची आव्हाने या पुस्तकांचे प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. संस्कृती संवर्धन समिती आणि सनातन धर्मसभा पुस्तकालय यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रा. नितीन बाठे, निकेश गुप्ता, निरव वोरा, श्रीकिसन अग्रवाल, विनोद देव, स्वानंद कोंडोलिकर यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, परकीय आक्रमणाचा दुर्दैवी इतिहास आमच्यासमोर आहे. केवळ सत्ता, संपत्तीसाठी त्यावेळची आक्रमणे नव्हती. Ajit Chavan आक्रंत्यांनी काशीचा विश्वनाथ, सोरटी सोमनाथासह येथील मानबिंदूंचा विध्वंस करून त्यांचा धर्म लादण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या पूर्वजांच्या क्षात्रतेजासमोर त्यांचा प्रत्येकवेळी पराभव झाला. सद्यस्थितीत धर्मद्रोही तसाच प्रयत्न करीत आहेत.देशात क्रुर,जुलमी इस्लामी राजवट स्थापित होईपर्यंत जर तुम्ही झोपून राहाल तर हिंदू इतका दुर्देवी समाज या पृथ्वीतलावर सापडणार नाही.इतिहासापासून आपण काहीच शिकणार नसाल तर इतिहासही तुम्हाला माफ करणार नाही.हिंदू एकत्र येवून मतदान करू शकला नाही तर भविष्यात मोठा संघर्ष होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
 
देशातील वक्फ बोर्डाचा कायदा हिंदूंसाठी किती घातक आहे याचा गोषवारा त्यांनी यावेळी मांडला आणि हा कायदा रद्द करून आपले स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी हिंदूंनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळा झाला. Ajit Chavan कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृती संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रा. नितीन बाठे यांनी तर आभार सनातन धर्म पुस्तकालयाचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी मानले. कार्यक्रमाचे संचालन स्वानंद कोडोंलिकर यांनी केले. कार्यक्रमाला अ‍ॅड. सुरेश अग्रवाल, उज्ज्वला देशमुख, राम भिरड, शरद वाघ, पुरूषोत्तम शिंदे, सोनल ठक्कर, पंकज सेहगल, खेमराज भटकर, अभयसिंह राजपूत, रुपेश वाखारकर, कपिलेश सरोदे, श्रीकांत गोयनका, डॉ.मिलिंद निवाने, रोहित केडिया, आनंद अग्रवाल, अ‍ॅड. अजय गुप्ता, किरीट मंत्री, सिद्धार्थ रुहाटिया आदींसह मान्यवर उपस्थित होते.