माँ एकवीरा दुर्गा उत्सव मंडळाचे ३१ वे वर्ष

एकवीरा महोत्सव साजरा करणार

    दिनांक :03-Oct-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Maa Ekvira Durga Utsav Mandal : येथील माँ एकवीरा दुर्गा उत्सव मंडळ सरस्वतीनगर, यवतमाळ या मंडळाचे हे ३१ वे वर्ष असून यावर्षी मंडळ ‘एकवीरा महोत्सवङ्क साजरा करत आहे. यावर्षी काठमांडू येथील भव्य देखावा साकारण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे.
 
 
ekvira
 
 
यवतमाळचा दुर्गा उत्सव हा देशातील कोलकातानंतर क्रमांक दोनचा उत्सव मानला जातो. राज्यभरातून भाविक यवतमाळ येथील मंडळांना भेटी देऊन दुर्गामातेचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी साकडे घालतात.
 
 
यात मोठा वाटा असलेले माँ एकवीरा दुर्गा उत्सव मंडळ दरवर्षी वेगवेगळे देखावे साजरे करीत असते. हे ३१ वे वर्ष साजरे करताना काठमांडू मंदिराचा भव्य देखावा, भव्य दुर्गा दरबार, दैनंदिन महाप्रसाद, गरबा, यासह विविध उपक्रमांद्वारे हे वर्ष साजरे करण्यात येणार आहे. धार्मिकता जपण्याबरोबरच सामाजिक भान जपण्याचा संकल्प यावेळी मंडळाने केला आहे.