मुंबई,
Sports Awards : आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रीडापटूंना गौरवणीत करण्यासाठी शासनाने पुरस्कारांची घोषणा केली आहे. सर्वोच्च क्रीडापटांना "शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू ), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), आणि साहसी क्रीडा पुरस्कार या पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र शासनाने 29 डिसेंबर 2023 ला मान्यता दिली.
09 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय पुरस्कार निवड समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीच्या शिफारसींच्या आधारे सन 2022-23 या वर्षासाठी पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ क्रीडापटू , क्रीडा मार्गदर्शक, आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले आहे. अशा व्यक्तींना "शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार" देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार (2022-2023) प्रदीप श्रीकृष्ण गांधे, मुंबई यांना प्रदान करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना "उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक /जिजामाता पुरस्कार" देण्यात येतो. यासाठी 2022-23 या वर्षातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी मान्यता देण्यात आली आहे. एकूण सहा खेळाडूंना हा पुरस्कार (2022-2023) प्रदान करण्यात आला आहे. त्याहून चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे, "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार" व "शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार" यासाठी 2022-23 या वर्षातील व्यक्तींना मान्यता देण्यात आली आहे. "शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (शदवयाांग खेळाडू )" यासाठी सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. एकूण 47 खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (2022-2023) प्रदान करण्यात येत आहे. त्याहून 22 पुरुष तर 20 महिलांचा समावेश आहे. तर "शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार (2022-2023" हा पुरस्कार एकूण दोन खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष यांचा समावेश आहे.