वर्धात पहिल्यांदाच खासदार पत्नी, भाऊ-भाऊ, पती-पत्नी मैदानात

30 Oct 2024 21:22:15
वर्धा :
Assembly Elections वर्धा जिल्हा चमत्काराचा जिल्हा आहे. येथे काहीही होऊ शकते आणि त्याची चर्चाही होते. विधानसभा निवडणुकीत खासदार पत्नी मयूरा अमर काळे मैदानात आहेत. यासोबतच कोटंबकर दाम्पत्य अपक्ष तर काँग्रेसचे उमेदवार शेखर शेंडे आणि रवी शेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
 
 
wardha
 
Assembly Elections वर्धा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता असेच म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी वर्धा लोकसभा मतदार संघ हिसकावून घेतला आता विधानसभेत आर्वीतून पंजा गायब केला. वर्धा जिल्ह्यात प्रथमच खासदार पत्नीने आमदाराकीसाठी उमेदवारी दाखल केली. गेल्या पंचवार्षिकपासुन अपक्ष उमेदवारी दाखल करणारे रवींद्र कोटंबकर यांनी स्वत:सह सरपंच असलेल्या पत्नी रेणुका यांचाही अर्ज दाखल केला. तर 5 वेळा आमदारसोबतच विधान परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले प्रमोद शेंडे यांचे चिरंजिव शेखर यांना काँग्रेसने अधिकृत चौथ्यांदा उमेदवारी दिली. यासोबतच शेखर शेंडे यांचे थोरले बंधू रवी शेंडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवसापर्यंत यातील कोणात्या अपक्ष कायम राहतात हे बघावे लागेल.
Powered By Sangraha 9.0