नागपूर,
Diwali 2024 भारतीय उत्कर्ष मंडळ गोसंवर्धन समितीच्या वतीने खापरी येथे सवत्स धेनु पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, सतीश गोयल, नितीन पाटील, अतुल वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही बघा : सुरु झाली दिवाळी...वसुबारस थाटात साजरी!
Diwali 2024 डॉ. बोकारे यांनी आपणच व्यवसायाच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था दृढ केली पाहिजे, असे सांगितले. अतुल वैद्य यांनी आयुर्वेदाची आधुनिक संशोधनांशी सांगड घालून नवीन प्रयोग करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रकृती स्वास्थ्यासाठी मानवाने गोपालन व गोसेवा करणे महत्त्वाचे आहे, असे नितीन पाटील यांनी वक्तव्य केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वैदिक मंत्रोच्चारात गोपूजन व आरती करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्याने तयार करण्यात आलेल्या आयुर्वेदिक च्यवनप्राशचे वितरण व विमोचन करण्यात आले. प्रास्ताविक गोरक्षण गोसंवर्धन समितीचे सदस्य अभय गोखले यांनी केले तर भारतीय उत्कर्ष मंडळाचे सहसचिव मकरंद कानिटकर यांनी आभार मानले. भारतीय उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जयंत मुलमुले, सचिव अतुल मोहरीर, गोरक्षण गोसंवर्धन समितीचे अध्यक्ष राजदिप सगदेव, मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमंतिनी कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला नागपूर शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.