नागपूर,
Government of Maharashtra : भारतीय संस्कृतीत गाईला मातेच्या दर्जा दिलेला असून ती पूजनीय आहे. महाराष्ट्र शासनाने गाईला राजमाता गोमाता असा दर्जा दिलेला आहे. पतंजली योग समिती आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ दत्तात्रयनगर, रघुजीनगर, यांनी संयुक्तरित्या देशी गायीचे पालनकर्ते दिलीप आणि सुवर्णा पाकलवार यांच्या निवासस्थानी जाऊन अध्यक्ष नामदेव फटिंग यांच्या हस्ते गाय आणि वासराची पूजा केली आणि त्यांचा सत्कार केला.
यावेळी गुलाब उमाठे यांनी गायी बद्दल माहिती सांगितली. Government of Maharashtra कार्यक्रमाच्या यशस्वी करण्या करिता वंदना तांदूळकर, माया सुनवाणी, साधना धाबेकर, श्रीराम दुरगकर, पद्माकर आगरकर यांनी श्रम घेतले. साधक साधिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: श्रीराम दुरगकर, संपर्क मित्र