प्रतापनगरातील शांती टॉवरमध्ये भरदिवसा दरोडा

    दिनांक :30-Oct-2024
Total Views |
- 10 लाख 50 हजार रोख व 150 ग्रॅम सोने चोरले
  
वर्धा, 
Pratap Nagar robbery : शहरातील प्रताप नगर येथील जुन्या आरटीओ ग्राउंड कॉम्प्लेक्समधील शांती टॉवरच्या दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा दरोडा घालत 10 लाख 50 हजार रुपये रोख आणि 150 ग्रॅम सोने चोरून नेले. ही घटना आज बुधवार 30 रोजी दुपारी 3.30 ते 5.30 च्या दरम्यान घडली.
 

 Pratap Nagar robbery
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतापनगर येथे शांती टॉवर नावाचे चार मजली इमारत बांधण्यात आली आहे. येथे निलेश पारसकर हे पत्नीसोबत दोन लहान मुलांसह राहतात. नीलेश पारसकर यांचे मुख्य बाजार संकुलात कपड्याचे दुकान आहे. दिवाळीचा हंगाम असल्याने दुकानात अधिक गर्दी असते. त्यामुळे तो नेहमीप्रमाणे जेवणासाठी घरी आला नाही. त्यांची पत्नी पुजा 3.30 वाजता जेवणाचा डबा घेऊन दुकानात गेल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. दोन कपाटात ठेवलेले 10 लाख 50 हजार रुपये व 150 ग्रॅम सोने चोरून पलायन केले. पारसकर यांच्या पत्नी पूजा सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घरी आल्या तेव्हा दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. एकाच तळमजल्यावरील दोन खोल्यांच्या वेगवेगळ्या कपाटातील साहित्य विखुरलेले होते. कपाटात ठेवलेले पैसे व सोने गायब होते. पुजाने ही माहिती पती नीलेश पारसकर यांना दिली. घरी आल्यानंतर त्यांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली.
 
 
Pratap Nagar robbery : माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्‍वर, रामनगरचे एसएचओ विपीन इंगळे, पीएसआय खोब्रागडे व दिनेश कांबळे, एपीआय राजेश जोशी, गिरीश चंदनखेडे, दीपक गेडे, गजानन मस्के, अमोल राऊत, गणेश सातपुते व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी फिंगर प्रिंट एक्स्पर्ट आणि डॉग ट्रॅकर यांना पाचारण करण्यात आले. मात्र, पोलिसांना कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.