- काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांचा बंडखोरांना इशारा
मुंबई,
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त बंडखोरांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरलेले असले तरी, कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसच्या कोणी अर्ज भरले असल्यास ते मागे घ्यावे, असा बंडखोरांना काँग्रेसचे प्रभारी Ramesh Chennithala रमेश चेन्नीथला यांनी दिला आहे.
यावेळी Ramesh Chennithala चेन्नीथला म्हणाले की, आमच्याकडून जे कुणी बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे अर्ज उद्या मागे घेण्यात येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही केवळ पक्षश्रेष्ठींनी घोषित केलेल्या उमेदवारांनाच एबी फॉर्म दिला आहे. अन्य कुणाला एबी फॉर्म दिलेला नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्यांचाच प्रचार करा, असे आवाहन मी कार्यकर्त्यांना करीत आहे. त्यामुळे ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले पाहिजेत. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. जिथे कुठे मतभेद असतील ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड सोडवण्याचे प्रयत्न करतील.
Ramesh Chennithala चेन्नीथला म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी एकसाथ मजबुतीने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाली आहे. मविआचे सर्व उमेदवार आता जनतेमध्ये आहेत. महायुतीशी तुलना केल्यास महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही ठाकरे गट, शरद पवार गट तसेच छोट्या छोट्या पक्षांना शक्य होईल तेवढे प्रतिनिधित्व देण्याचा केला आहे. महाविकास आघाडीत असलेल्या सर्व घटक पक्षांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे. उलट महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपाचे वर्चस्व दिसून येत आहे.