2 कोटी द्या, नाहीतर...सलमानच्या मागे धमकीचे ग्रहण!

30 Oct 2024 09:48:16
मुंबई,
Salman threatened again मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मुंबई वाहतूक पोलिसांना मेसेजद्वारे देण्यात आली आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने करोडोंची खंडणीही मागितली आहे. या मेसेजनंतर प्रशासन कारवाईत आले असून मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. याआधीही लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दोन कोटी रुपये न दिल्यास सलमान खानला मारले जाईल, असा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला देण्यात आला होता. धमकीचा संदेश मिळाल्यानंतर वरळी जिल्हा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 हेही वाचा : महाराष्ट्रात ज्यांच्या हाती विदर्भ त्याचीच सत्ता!
 
 
alman
 
प्राथमिक माहितीनुसार, वरळी वाहतूक पोलिसांना अज्ञात व्यक्तीने दोन धमकीचे संदेश पाठवले आहेत. वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (२), ३०८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी, मंगळवारी मुंबई पोलिसांनी सलमान खान आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि दिवंगत बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांना धमकीच्या कॉल प्रकरणी नोएडा येथे एका 20 वर्षीय व्यक्तीला अटक केली. मोहम्मद तय्यब, गुरफान खान या नावाने ओळखल्या Salman threatened again जाणाऱ्या आरोपीला नोएडा येथील सेक्टर 39 येथून अटक करण्यात आली. धमकीशिवाय आरोपी मोहम्मद तय्यब उर्फ ​​गुरफानने झीशान सिद्दीकी आणि सलमान खान यांच्याकडेही पैसे मागितले होते. 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी दसऱ्यानिमित्त फटाके फोडत असताना झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांची हत्या करण्यात आली होती. एका दिवसानंतर, लॉरेन्स बिश्नोई टोळीने माजी राज्यमंत्र्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आणि म्हटले की, सलमान खानशी त्याच्या जवळच्या संबंधांमुळे त्याच्यावर हल्ला झाला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. हेही वाचा : अखेर हरवलेले श्रीनिवास वनगा भेटले...
 
Powered By Sangraha 9.0