वर्धा जिल्ह्यात समीर देशमुख यांच्यासह 13 जणांचे अर्ज अपात्र

30 Oct 2024 21:25:17
वर्धा :
विधानसभा निवडणुकीकरिता नामांकन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर होती. नामांकन अर्ज सादर केलेल्या अर्जाची आज 30 ऑक्टोंबर रोजी छाननी करण्यात आली. यात वर्धा विधानसभेत शरद पवार राकाँचे उमेदवार Sameer Deshmukh समीर सुरेश देशमुख यांच्या एका अर्जासह आर्वी विधानसभा मतदार संघात 1, देवळी विधानसभा मतदार संघात 4, हिंगणघाट मतदार संघात 4 तर वर्धा विधानसभा मतदार संघात 4 अर्ज असे 13 अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे.
 
 
Sameer Deshmukh
 
Sameer Deshmukh : आर्वी विधानसभा मतदार संघात महेश गाडरे (अपक्ष) एक अर्ज, देवळी विधानसभा मतदार संघात विठ्ठल मुन (अपक्ष) यांचे दोन अर्ज, शुध्दोधन महादेव मेंढे (अपक्ष) एक अर्ज, अब्दुल समीर अब्दुल हमीद शेख (अपक्ष) एक अर्ज असे चार अर्ज, हिंगणघाट विधानसभा मतदार संघात कोमल किशोर बावने (भारतीय जनसम्राट पार्टी) एक अर्ज, कौशल्यखान जब्बारखान पठाण (अपक्ष) एक अर्ज, अनील महादेवराव मुन (रिपब्लीकन पाटी ऑफ इंडिया- ए) एक अर्ज, संजय विठ्ठलराव राऊत (हिंद राष्ट्र संघ) एक अर्ज, वर्धा विधानसभा मतदार संघात अनोमदर्शी उध्दवराव भैसारे (बहुजन समाज पार्टी ) एक अर्ज, रवी प्रमोद शेंडे (भाराकॉ) एक अर्ज अपात्र व (अपक्ष) पात्र, समीर सुरेश देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार ) एक अर्ज अपात्र व (अपक्ष) एक अर्ज पात्र, निखील सातपुते (अपक्ष) एक अर्ज अपात्र व एक पात्र ठरविण्यात आले.
Powered By Sangraha 9.0