- तीन अंतराळवीरांचा स्थानकात सुखरूप
 
बीजिंग, 
चीनने बुधवारी आपल्या अंतराळ स्थानकावर सहा महिन्यांच्या मोहिमेवर तीन अंतराळवीर यशस्वीरीत्या पाठवले. यामध्ये देशातील पहिल्या महिला अंतराळ अभियंत्याचाही समावेश आहे. चीनने बुधवारी पहाटे जिऊक्वान स्पेस लाँच सेंटरवरून आपले ‘शेन्झोऊ-१९’ अंतराळ यान प्रक्षेपित केले. चीनने आपल्या लाँग मार्च-२एफ रॉकेटच्या साहाय्याने launch of China's 'Shenzhou-19' शेन्झोऊ-१९ यान अंतराळात पाठवले.
 
 
प्रक्षेपणानंतर सुमारे १० launch of China's 'Shenzhou-19'  ‘शेन्झोऊ-१९’ हे अंतराळयान त्याच्या रॉकेटपासून वेगळे झाले आणि त्याच्या नियुक्त कक्षेत प्रवेश केला. चायना मॅनेड स्पेस एजन्सीने (सीएमएसए) जाहीर केले की, अंतराळवीर चांगल्या स्थितीत आहेत आणि प्रक्षेपण पूर्णपणे यशस्वी झाले. स्वत:चे अंतराळ स्थानक असणारा सध्या चीन हा एकमेव देश आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, चीनने चंद्रावर अंतराळवीर पाठविण्यासह एक अंतराळ  विकसित करण्याची आपली योजना जाहीर केली. 
 
 
स्वतःचे अंतराळ स्थानक बनवण्याव्यतिरिक्त, चीनने अनेक अंतराळ मोहिमाही प्रक्षेपित केल्या आहेत ज्यात चंद्राच्या दूरच्या बाजूने नमुने गोळा करणे आणि वैज्ञानिक अभ्यासासाठी पृथ्वीवर परत करणे या पहिल्या चंद्र मोहिमेचा समावेश आहे. चीनच्या स्पेस एजन्सी सीएनएसएचे प्रवक्ते लिन शिकियांग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की,  स्पेस बायोलॉजी, स्पेस मेडिसिन आणि नवीन अंतराळ तंत्रज्ञानासह ८६ अंतराळ विज्ञान संशोधन आणि तंत्रज्ञान चाचण्या घेतील. हे सदस्य सुमारे सहा महिने अंतराळ स्थानकात राहणार आहेत.
वांग हाओ पहिली अंतराळ अभियंता
launch of China's 'Shenzhou-19' : ‘शेन्झोऊ-१९’ च्या सदस्यांमध्ये मिशन कमांडर काई शुझे आणि अंतराळवीर सॉन्ग लिंगडोंग आणि वांग हाओ यांचा समावेश आहे. वांग  चीनची एकमेव महिला अंतराळ अभियंता आहे आणि अंतराळात जाणारी तिसरी चिनी महिला आहे. अंतराळातील ही नवीन चमू अंतराळ विज्ञान आणि अप्लिकेशन टेस्टिंग तसेच स्पेस डेबि‘जपासून संरक्षणात्मक उपकरणे बसवेल.