srk birthday party शाहरुख खानचे घर दिवाळीपूर्वी सजवण्यात आले आहे. दिवाळीच्या दोन दिवसानंतर अभिनेत्याच्या घरी एक ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. त्यासाठीची तयारीही सुरू झाली आहे. घराच्या सजावटीचा व्हिडिओही समोर आला आहे. शाहरुख खानचे मुंबईतील निवासस्थान मन्नत दिवाळीसाठी सज्ज झाले आहे. संपूर्ण घर प्रकाशाने चमकत आहे. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी त्यांच्या दिवाळी सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात. सणांआधी, या जोडप्याने दिवाळीच्या उत्साहाचे दर्शन घडवणाऱ्या सुंदर सजावटीच्या दिव्यांनी आपले घर सजवले आहे. हा दिवाळी सेलिब्रेशन आणखी खास बनला आहे कारण शाहरुख खान दिवाळीच्या दोन दिवसांनी म्हणजे २ नोव्हेंबरला ५९ वर्षांचा होणार आहे. मन्नतचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये, घराची सजावट पाहायला मिळत आहे. खास प्रसंगी शाहरुख खान या घरातून त्याच्या चाहत्यांना भेटतो आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक असलेले त्याचे चाहते या घराबाहेर जमत असतात.
दिवाळीत पार्टीचा ट्रेंड
केवळ शाहरुख srk birthday party खानचे घर मन्नतच नाही तर रोहित शेट्टी आणि कार्तिक आर्यनसह इतर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांमध्येही दिवाळीची चमक पाहायला मिळत आहे. प्रत्येकाची घरे दिव्यांनी उजळून निघाली आहेत. बी-टाऊनमध्ये प्रत्येक खास सणाप्रमाणे दिवाळीलाही पार्टी करण्याचा ट्रेंड आहे. यावेळी, देखील एकता कपूर आणि मनीष मल्होत्रा यांनी पार्टी आयोजित केली होती. ज्यामध्ये, सर्व स्टार्स दिसले होते. याशिवाय टीव्ही सेलिब्रिटीही पार्टी करताना दिसले. तसे, शाहरुख खानच्या घरीही एक मेगा सेलिब्रेशन होणार असल्याचे बोलले जात आहे. दिवाळी व्यतिरिक्त लोक त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची वाट पाहत असतात. गौरी खाननेही २०० कार्ड पाठवल्याचे वृत्त आहे.
या चित्रपटांमध्ये पाहिले होते
शाहरुख खान शेवटचा srk birthday party 'डंकी 'मध्ये दिसला होता. राजकुमार हिरानी यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले. हा चित्रपट डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. गेले वर्ष अभिनेत्यासाठी दमदार होते. 'डंकी' व्यतिरिक्त आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात 'जवान' व 'पठाण' होते. दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. 'जवान' हा गेल्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्याच्या कमाईचा आकडा १००० कोटींच्या पुढे गेला आहे.
या चित्रपटात शाहरुख दिसणार
आता लवकरच srk birthday party शाहरुख खान 'किंग' या नव्या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या वाढदिवशी यासंबंधीचे मोठे अपडेट पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खानसोबत आहे. याशिवाय, या चित्रपटात अभिषेक बच्चनही दिसणार असल्याची चर्चा आहे.