कोलकाता,
Rape News : पश्चिम बंगालमध्ये काही काळापासून सातत्याने बलात्काराच्या बातम्या येत आहेत. कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असतानाच यानंतरही बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला, कुलतली आणि जयनगर भागात हिंसाचार उसळला होता जेव्हा एका 9 वर्षांच्या मुलीचे अपहरण, बलात्कार आणि हत्या करण्यात आली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर काही तासांनी तिचा मृतदेह सापडला. आता पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातून बलात्काराची घटना समोर आली आहे.
महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे
24 परगणा जिल्ह्यात एका 40 वर्षीय मूक आणि मानसिक आजारी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, पीडित मुलगी घरातून बाहेर आल्यानंतर आरोपीनी तिला एका निर्जन घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. महिलेच्या कुटुंबातील सदस्याने दावा केला की स्थानिक पंचायत सदस्याने हे प्रकरण शांत करण्यासाठी 2 लाख रुपयांची भरपाई देऊ केली, परंतु ती नाकारण्यात आली.