तुम्हाला माहिती पहिल्यांदा नागपुरात कधी बसली बंगाली देवी? घ्या जाणून

04 Oct 2024 15:16:39
नागपूर,
Bengali devi नागपुरात गेल्या १३३ वर्षांपासून बंगाली देवीची स्थापना करण्यात येत आहे. धंतोलीच्या दिनानाथ हायस्कूलमध्ये बंगाली परंपरेनुसार दुर्गा देवीची पूजा करण्यात येते. दुर्गा देवीचा साज शृंगार करण्यात येतो. तसेच बंगाली परंपरेनुसार तिथे भजन, किर्तनासोबतच विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात येतात. दशमीला शेंदूर खेळल्या जातो सर्व काही याठिकाणी बंगाली परंपरेनुसार होते. चला तर मग जाणून घेऊ या बंगाली दुर्गा देवी बसविण्याचा काय आहे इतिहास...
 
 
 हेही वाचा : ‘बर्ड फ्लू’ संसर्गामुळे हाहाकार, 12 हून अधिक वाघांचा मृत्यू!
 
कशी सुरु झाली ही परंपरा ?
१७५० मध्ये ओडिशातून Bengali devi बंगाली सरदार दुर्लभराम यांना युद्धबंदी म्हणून नागपुरात आणण्यात आले होते. नागपुरात येणारे पहिले बंगाली हेच होते. त्यानंतर १६१ वर्षांनंतर म्हणजे १९११ मध्ये नागपुरातील धंतोली भागातील पटवर्धन ग्राऊंडवर बंगाली दुर्गोत्सव साजरा झाला. तत्कालीन भोसले राजे रघुजी यांनी त्याचे उद्घाटन केले होते. त्या नंतर १९१८ पासून आता असलेल्या दीनानाथ हायस्कूल येथे नवरात्र साजरा करण्यात येतो. १७९३ ते १७९८ या कालावधीत राधाकांत मुंशी हे भोसले राजाशी तहाची बोलणी करण्यासाठी आले होते. त्या नंतर १८५५ मध्ये येथील ब्रिटिश रेसीडेन्ट जॉर्ज प्लाउडेन यांचे दिवाण म्हणून गोविंदचंद्र मुंशी आले. त्याच दरम्यान श्रीनाथ चटोपाध्याय, समदत्त आदी बंगाली आले. १८७४ मध्ये बिपीनकृष्ण बाशु गव्हर्नमेट ॲडव्होकेट म्हणून आले होते. त्यांच्या समवेत तेव्हा १०० बंगाली होते. मॉरिस कॉलेज व नागपूर विद्यापीठाच्या संस्थापकांपैकी बिपीनकृष्ण बाशू एक होते. इथून बंगाली नागपुरच्या लोकजीवनात रूजले.
 
बंगाल्यांसाठी दुर्गोत्सव Bengali devi हा जणू काही दिवाळीच. सासरी गेलेली मुलगी मुलाबाळांसह माहेरी येते. नवे कपडे घेणे, गोडधोड खाणे, आनंद साजरा करण्यात येतो. बंगाली मान्यतेनुसार तिच्यासोबत गणेश, कार्तीकेय ही मुले आणि लक्ष्मी आणि सरस्वती या मुली असतात. हिंदुंची घटस्थापना आश्विन शु. प्रतिपदेला होते. यावर्षी गुरूवार ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापना आहे. तर बंगाली घटस्थापना षष्ठीला जी यावर्षी षष्ठी ९ ऑक्टोबर रोजी आहे. षष्टीला दुर्गेची प्राणप्रतिष्ठा रात्री करण्यात येणार आहे. रात्रीला दुर्गेची प्राणप्रतिष्ठा करण्यामागे प्रभू रामाची कथा आहे. रावणाचा पराभव करण्यासाठी प्रभू रामचंद्राने देवीची पूजा करून तिला जागवले आणि त्यावेळी देवीचा शयनकाल सुरू होतो . रामाने देवीला अवेळी जागवले म्हणून तिची प्राणप्रतिष्ठा रात्री केली जाते अशी मान्यता आहे. या पूजेला "अकाल बोधन' असे म्हटले जाते. अकाल म्हणजे अवेळी आणि बोधन म्हणजे जागवणे असा अर्थ होतो. दशमीला दुर्गा देवीचे विसर्जन केले जाते.
 
नागपूरच्या धंतोलीतच नाही तर अनेक ठिकाणी Bengali devi बंगाली दुर्गा देवीची स्थापना करण्यात येते. मोतीबाग बंगाली दुर्गोत्सवाला ७५ वर्षे होत आहे. बंगाली कल्चरल सोसायटी अंतर्गत सार्वजनिक दुर्गोत्सव, काटोल रोड येथे ६४ वर्षे पूर्ण झाली. सीपीडब्ल्यूडी कॉलनी, वसंत पंचमी मैदानात दुर्गा मातेची स्थापना करण्यात येते.
Powered By Sangraha 9.0