नागपूर,
Municipal Commissioner मानेवाडा भागातील श्रीहरीनगर नंबर २ व ३ येथे सांडपाणी वाहण्यासाठी टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन छोटी व फार जुनी असून ती वारंवार बंद होत असल्यामुळे या भागातील नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे.नवीन १२ इंची ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणी श्रीहरी नगर विकास मंडळाने महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांचेकडे केली आहे.
महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची श्रीहरीनगर विकास मंडळाच्या शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. या शिष्टमंडळात श्रीहरीनगर विकास मंडळाचे अध्यक्ष विजय लोणारे, सचिव राजेश मानकर व सदस्य डॉ. सोहन चवरे उपस्थित होते. Municipal Commissioner यासोबतच श्रीहरीनगर येथील काही भूखंडावर आरक्षण असून हे आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याबाबत त्यांनी विचार करण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी या भागातील विविध समस्या मांडण्यात आल्या. मनपा आयुक्तांनी या भागात भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
सौजन्य: सोहन चवरे, संपर्क मित्र