अकोल्यात उसळली दंगल, दगडफेक आणि जाळपोळ

ऑटोेसह तीन दुचाकी भस्मसात

    दिनांक :07-Oct-2024
Total Views |
अकोला, 
Akola Riots येथील जुन्या शहरातील हरिहरपेठ परिसरात सोमवार, 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गाडगेबाबा पुतळ्या जवळ उपद्रवखोरांच्या एका गटाने तुफान दगडफेक केली. त्याला दुसर्‍या गटाने प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यातच काहींनी ऑटोला आग लावली. या आगीत तीन दुचाकी भस्मसात झाल्या आहेत. हा वाद ऑटोेला लागलेल्या धडकेमुळे झाल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
 

अकोला १  
 
Akola Riotsदरम्यान, याचे पडसाद लगतच्या शिवसेना वसाहत येथे उमटले. येथे झालेल्या दगडफेकीत माजी नगरसेवक अमोल गोगे गंभीर जखमी झाले आहेत.यात आणखी एक नागरिक जखमी झाला आहे.
 
 

अकोला २
Akola Riots शहरातील हरिहरपेठ परिसरात ऑटोचा धक्का लागल्याचा क्षुल्लक वाद पाहता-पाहता दोन गटांतील संघर्षात बदलला. यातील उपद्रवखोरांच्या एका गटाने शिवीगाळ करीत तुफान दगडफेक सुरू केली.त्यांची ही दगडफेक पूर्व नियोजित होती असा संशय आहे. दगडफेकीनंतर दुसर्‍या गटानेे प्रतिउत्तर दिले. हरिहरपेठ येथे जवळपास 20-25 मिनिट हा संघर्ष सुरू होता. दरम्यान, काहींनी ऑटो पेटवून दिला. या आगीत ऑटोसह तीन दुचाकीही भस्मसात झाल्या. अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शिने दिली.
 
 

अकोला ३
 
Akola Riots दरम्यान जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंह, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुळकर्णी, एलसीबीचे प्रमुख किशोर शेळके, ठाणेदार शशिकांत लेवरकर, दंगल नियंत्रण पथक यांच्यासह मोठा पोलिस ताफा तातडीने घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या जमावावर नियंत्रण मिळविण्यात आले. सद्यस्थितीत तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर या घटनेला कारणीभूत असलेल्यांना अटक करून त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.
 
 
अकोला ४
 
हरिहरपेठचे पडसाद शिवसेना वसाहतमध्ये
Akola Riots हरिहरपेठ परिसरात झालेल्या घटनेचे पडसाद शिवसेना वसाहत येथेही उमटले. येथील नगरसेवक अमोल गोगे आणि परिसरातील नागरिक नेमके झाले तरी काय असे पाहण्याचा प्रयत्न करीत असतानाच उपद्रवखोरांनी मोठी दगडफेक केली. या दगडफेकीत माजी नगरसेवक अमोल गोगे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गोेगे यांच्यावर झालेल्या दगडफेकीच्या वेळी दोन पोलिस कर्मचारी तेथे उपस्थित होते, अशी चर्चा आहे.