स्वामी विवेकानंदांवरील ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो' ने भारावले

    दिनांक :07-Oct-2024
Total Views |
नागपूर,
Ambazari केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला अंबाझरीवरील स्वामी विवेकानंदांच्या जीवनावरील ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो' बघून नागपूरकर भारावले. त्याचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सायंकाळी झाले. स्वामी विवेकानंदांच्या जीवन चरित्राचे अत्याधुनिक माध्यमातून घडलेले दर्शन अनोखे व अफलातून असल्याची भावना उपस्थितानी व्यक्त केली.
 
 
  
अंबाझरी शो
 
 
Ambazari अंबाझरी उद्यानात साकारण्यात आलेल्या या शोच्या लोकार्पण सोहळ्याला मध्यप्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय, माजी आमदार गिरीश व्यास, नासुप्रचे सभापती संजय मीना, विश्वस्त विनोद इटकेलवार तसेच जयंत खळतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन गडकरी म्हणाले की, स्वामी विवेकानंद भारताच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक आहेत. प्रगत भारताचे स्वप्न त्यांनी बघितले होते. अठरावे शतक मोगल, एकोणविसावे ब्रिटिश, विसावे अमेरिका, एकविसावे शतक भारताचे असेल, असे भाकित त्यांनी वर्तवले होते. त्यामुळे त्यांचे विचार आधुनिक माध्यमातून शाळकरी मुले व तरुणांपयरत पोहोचावे, या उद्देशाने हा शो तयार करण्यात आला आहे.
 
Ambazari नितीन गडकरी यांच्यात उत्तम कलाकार ओळखण्याचे व त्यांना शोधून काढण्याचे अनोखे कौशल्य आहे. त्यामुळेच प्रत्येकवेळी नागपूरला आलो की नवीन काहीतरी अनुभवायला मिळते. आता इनोव्हेशनची राजधानी म्हणून नागपूरची देशभरात ओळख होऊ लागली आहे, असे  गौरवोदगार  कैलाश विजयवर्गीय यांनी काढले. यावेळी ऑस्कर विजेते साऊंड इंजिनियर रसुल पकुटी, एमी अवॉर्ड विजेते अलफान्सो रॉय, ललित विकमशी, डॉ. रोहित माने, प्रिया चौधरी, पी.एस. पाटणकर, निरंजन देशकर, सतीश साल्पेकर, सुहास भावे, वरदराजन यांचा सत्कार करण्यात आला.