नवरात्रीची अष्टमी-नवमी एकाच दिवशी आहे का?

तारखांबाबतचा गोंधळ दूर करा

    दिनांक :07-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली
या वर्षी शारदीय ashtami navami puja नवरात्रीच्या महाअष्टमी आणि महानवमीची तारीख आणि वेळ काय असेल ? ते येथे जाणून घ्या. नवरात्रीत अष्टमी आणि नवमी पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी कन्यापूजाही केली जाते. दोन्ही दिवशी मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. अष्टमी-नवमी ही महाअष्टमी, दुर्गाष्टमी आणि महानवमी पूजा म्हणून ओळखली जाते. यंदा अष्टमी आणि नवमी तिथीबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. शारदीय नवरात्रीची अष्टमी आणि नवमी कोणत्या दिवशी साजरी केली जाईल. पूजेसाठी कोणता शुभ काळ सर्वोत्तम आहे हे आज आपण इथे बघणार आहोत .
 
 
 
shardiy navratri 
 
नवरात्री अष्टमी पूजा २०२४ मुहूर्त आणि तारीख
हिंदू कॅलेंडरनुसार, ashtami navami puja अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२:३१ वाजता सुरू होईल. अष्टमी तिथी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:०६ वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत ११ ऑक्टोबर २०२४ रोजी नवरात्रीची महाअष्टमी पूजा साजरी होणार आहे.
 
नवरात्री महा नवमी २०२४ मुहूर्त आणि तारीख
पंचागानुसार ,ashtami navami puja आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:०६ वाजता सुरू होईल. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०. ५८ वाजता नवमी तिथी समाप्त होईल. महानवमी पूजा ११ ऑक्टोबरलाच साजरी केली जाईल. तर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी नवरात्री साजरी होणार आहे.
 
२०२४ मध्ये अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहे का?
पंचांगानुसार, ashtami navami puja यंदा शारदीय नवरात्रीची अष्टमी आणि नवमी पूजा एकाच दिवशी होणार आहे. महाअष्टमी आणि महानवमीची पूजा ११ ऑक्टोबरलाच होणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी तुम्ही अष्टमीची पूजा दुपारी १२. ०६ च्या आधी करू शकता आणि त्यानंतर, तुम्ही महानवमीची पूजा करू करा . या दिवशी कन्यापूजनही करण्यात येईल . महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी नऊ कुमारी मुलींना भोजन दिल्यास माता राणीचा आशीर्वाद प्राप्त होतो. मुलींना खाऊ घातल्यानंतर त्यांना काही भेटवस्तू द्या. असे केल्याने घरात सुख-समृद्धी राहते.