नागपूर टपाल सेवेची सर्व कार्यालये आणि कर्मचारी कटिबध्द : शोभा मधाळे

आज जागतिक टपाल दिवस

    दिनांक :09-Oct-2024
Total Views |
नागपूर
world postal day १८७४ पासून जगात टपाल सेवेची सुरुवात झाली असून, ही सेवा मागची 150 वर्ष जगातील वेगवगळ्या देशांमधे एकमेकांच्या सहकार्यातून जनतेला टपाल सेवा अविरतपणे पुरवीत आहे. याचाच एक भाग म्हणून ७ ते ९ ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय टपाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामधून तळागाळातल्या जनतेला अंत्योदयाच्या माध्यमातून टपालसेवा पुरविण्यासाठी नागपूर टपाल सेवेची सर्व कार्यालये आणि कर्मचारी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन नागपूर टपाल क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनी केले.
 
 
 
tapal
 
 
 
 
आज ९ऑक्टोबर जागतिक टपाल दिनाच्या निमित्त आयोजित प्रेस मीट कार्यक्रम राजहंस हॉल जीपिओ कार्यालय नागपूर येथे आयोजित करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी, पत्रसूचना कार्यालय नागपूरचे सहाय्यक संचालक शशिन राय यांची प्रमुख उपस्थिती होती. 
राष्ट्रीय world postal day टपाल महोत्सवाच्या माध्यमातून आधार नोंदणी आणि बालिका सशक्तीकरणावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुर पोस्टल क्षेत्रामार्फत राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या विविध योजना राबविल्या जात असून, जनतेने याचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले. पुढील महिन्यात २८ आणि २९ नोव्हेंबरला टपाल तिकीट आणि टपाल सेवेचा इतिहास याबद्दलचे प्रदर्शन असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या world postal day काळात पार्सल कुरिअर संदर्भात काही काम असल्यास पहिला विचार हा भारतीय टपाल सेवेच्या स्पीड पोस्ट सेवेचा येतो. आणि त्यालाच प्राधान्य देण्यात येते. यातच टपाल विभागाची विश्वासहार्यता दिसून येते . भारतीय टपाल विभागाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक समस्या,आव्हानांना समोर जाऊन आपले कार्य पार पाडले आहे. भारतीय टपाल विभागाने आता नवे रूप बँकिंगच्या माध्यमातून विविध सेवा जनतेपर्यंत पोहोचवलेले आहे. देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यात भारतीय टपाल सेवेची कार्यालय अविरतपणे कार्य करीत असून ती अशीच सुरू राहतील असे प्रतिपादन पत्र सूचना कार्यालय नागपूरचे सहाय्यक संचालक शशिन राय यांनी केले. यावेळी अतिथींच्या हस्ते स्पेशल कॅन्सलेशन स्टॅम्पचे सुध्दा विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाला नागपूर टपाल क्षेत्रातील विविध कर्मचारी आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमा दरम्यान नागपूर क्षेत्राच्या टपाल सेवेच्या कार्याची माहिती देताना पोस्टमास्टर जनरल यांनी सांगितले,की नागपूर क्षेत्रामध्ये 11 जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र समविष्ट असून मुख्य,उप,शाखा या प्रकारात एकूण ३८८७ डाकघर समाविष्ट आहेत.नागपुर क्षेत्रात एकूण ९ पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र आहेत. या केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत १०,०९० पासपोर्ट अर्जावर प्रक्रिया करण्यात आली आहे.
नागपुर क्षेत्रात पोस्टाची एकूण 16 एटीएम
या क्षेत्रात इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या 11 शाखा असून, आतापर्यंत ३६.७० लाख बचत खाती उघडण्यात आली आहे. यामधून, जुलै ते सप्टेंबर 2024 या कालावधीत 8,75,455 खाती उघडण्यात आली असून, त्यापैकी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने अंतर्गत जास्तीत जास्त खाती उघडण्यात आली असून त्याद्वारे लाभार्थ्यांना रक्कम वितरीत केल्या जात आहे.
क्षेत्रात 248 आधार अद्यावत आणि नावनोंदणी केंद्रे
विविध शिबीरांमार्फत सेवा पुरविल्या जात आहेत. आर्थिक वर्ष २०२४-२०२ ५ मधे ३,७०,२७३ पोस्ट ऑफिस बचत खाती उघडली आहे. यात ३३३१० सुकन्या समृद्धी खाती आहेत. डाकघर शाखामंधे बँकिग सुविधा देण्यासाठी खेड्यापाड्यात ५ किमीच्या आता १३० अन-बँकिंग शाखा डाकघर उघडल्या गेली आहेत.
याचप्रमाणे, नागपूर क्षेत्रातील सर्व डाकघर दर्पण २.० या डिजिटल प्लॅटफॉर्म वर उपलब्ध करून पोस्टाच्या सेवा सुविधा अजून जलद आणि सुलभ केल्या आहेत.
डाक जीवन विमा योजनेत नागपूर क्षेत्र महाराष्ट्र परिमंडळ मधे प्रथम आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेत द्वितीय स्थानावर आहे.यावेळी, महिला सन्मान बचत प्रमाण पत्र आणि डाक जीवन विमा योजनेसह भारतीय डाक विभागाच्या विविध योजने बद्दल माहिती देण्यात आली