या गावात महिला ५ दिवस कपडे घालत नाहीत

10 Nov 2024 13:49:36
Pini Village आपल्या देशात अशा अनेक प्रथा आहेत ज्यांची आपल्याला पूर्ण माहितीही नाही. हिमाचल प्रदेशातील कुल्लू गावात अशीच एक प्रथा मानली जाते. ज्यामध्ये, महिला कपडे घालत नाहीत. होय, अशी परंपरा क्वचितच इतर कोठेही पाळली जाते. परंतु, ती पिनी गावात पाळली जाते. याची संबंधित कथा काय आहे ? ते जाणून घेऊया.
हिमालयाच्या कुशीत वसलेले पिनी गाव आपल्या अनोख्या परंपरांसाठी शतकानुशतके ओळखले जाते. या परंपरांपैकी एक सर्वात आश्चर्यकारक आणि बोलली जाणारी परंपरा म्हणजे या गावातील (नग्न गाव) महिला काही खास प्रसंगी कपडे घालत नाहीत. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा आजही पाळली जाते. ही परंपरा का मानली जाते आणि त्यामागील कथा काय आहे? हे आपण पाहूया.
 
 
pini village
 
ही परंपरा काय आहे?
पिनी गाव हे Pini Village हिमाचल प्रदेशात वसलेले एक अतिशय सुंदर गाव आहे. येथे तुम्हाला अशा अनेक प्रथा ऐकायला मिळतील, ज्यांच्याबद्दल तुम्ही याआधी क्वचितच ऐकले असेल. यामध्ये कपडे न घालण्याची परंपरा समाविष्ट आहे. इथे स्त्रिया श्रावण महिन्यात पाच दिवस कपडे घालत नाहीत, तर लोकरीचे बनवलेल्या कपड्यानी अंग झाकतात.
असे मानले जाते की, ही परंपरा न पाळणाऱ्या महिलेला तिच्या कुटुंबात अपघाताचा सामना करावा लागतो. त्यामुळे, आजही महिला ही परंपरा पाळत आहेत. या परंपरेमागे अनेक कथा आहेत. यातील काही कथा देवी-देवतांशी संबंधित आहेत, तर काहींच्या मते ही परंपरा निसर्गाशी एकरूपता प्रस्थापित करण्याशी संबंधित आहे.
या परंपरेमागची कथा आहे?
या परंपरेशी संबंधित Pini Village अशी एक कथा आहे की, एकेकाळी या गावात एका राक्षसाची दहशत होती, जे चांगले कपडे घातलेल्या स्त्रियांना पळवून नेत असत. मग, त्याच्या अत्याचाराने त्रस्त होऊन येथील देवाने त्या राक्षसाचा वध केला. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली आणि या काळात महिला पाच दिवस कपडे घालत नाहीत.
मात्र, आता या गावातील प्रत्येक महिला ही परंपरा पाळत नाही. या काळात कपडे पूर्णपणे सोडून देण्याऐवजी ती पातळ कपडे घालते, परंतु ज्या स्त्रीला ही परंपरा पाळायची आहे, ती हे पाच दिवस घरातच राहते, बाहेर जात नाही व कोणाला भेटत नाही. या काळात पती-पत्नी एकमेकांना भेटत नाहीत, बोलत नाहीत.
पुरुषांनाही नियम पाळावे लागतात
या उत्सवात पुरुषांनाही Pini Village काही नियम पाळावे लागतात. या काळात ते मांस, मासे किंवा दारू पिऊ शकत नाहीत. येथील लोक हा सण अतिशय पवित्र मानतात त्यामुळे, या पाच दिवसांत बाहेरच्या व्यक्तीला गावात येण्यास मनाई आहे.
Powered By Sangraha 9.0