मारेगाव,
case of molestation of a woman महिलेच्या विनयभंग प्रकरणी आराेपी शंकर उर्फ शुभम सुधाकर परचाके (वय 30, कुंभा ता. मारेगाव) याला 3 वर्षे सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दवने यांनी सुनावली. 16 फेब्रुवारी राेजी तक्रारदार व तिचा पती घरून शेतात जात असताना आराेपी हा मागे येऊन ही महिला गावाबाहेर निघताच तिच्या समाेर आला.
मामा कुठे गेले असे विचारले असता, मामा समाेर आहे असे तिने सांगितले. तेव्हा आजूबाजूला काेणीही नसल्याचे पाहून आराेपीने तिचे दाेन्ही हात पकडून तिला खाली पाडले व विनयभंग केला. त्यावेळी ही महिला जाेरात ओरडल्याने समाेर गेलेले पती आवाज ऐकून परत आले. तेव्हा आराेपीने महिला व तिच्या पतीला आणि जवळ आलेल्या सर्वांनाच तुम्ही काेणालाही सांगितले किंवा पाेलिसांना तक्रार दिली तर तुम्हाला शेतात येऊन मारून टाकताे, अशी धमकी दिली.
case of molestation of a woman या प्रकाराची तक्रार आल्यानंतर मारेगाव पाेलिसांनी आराेपी शुभम परचाके विरुद्ध भादंवि कलम 354, 354 (ब) व 506 अंतर्गत गुन्हा नाेंद केला. तपास सहायक फौजदार सुरेंद्र टाेंगे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणात सरकारच्या वतीने आठ साक्षी नाेंदवण्यात आल्या. सरकारी पक्षाचे वतीने सहायक सरकारी वकील कपूर व खांडरे व ठाणेदार साळुंके यांच्या मार्गदर्शनात काेर्ट पैरवी विष्णू कुमरे यांनी केली.