वर्धा,
vidhansabha 2024 आपण कधीच कोणावर थेट आरोप करत नाही. वर्धेत दोन सूतगिरण्या होत्या, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ज्यांना सांभाळता आली नाही ते निवडणूक लढवायाला निघाले आहेत असा घणाघात भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. पंकज भोयर यांनी केला. यावेळी ना. नितीन गडकरी, माजी खासदार रामदास तडस, सागर मेघे, सुरेश वाघमारे, आदी उपस्थित होते.
vidhansabha 2024 वर्धेत बापूराव देशमुख, प्रमोद शेंडे यांनी सहकारमध्ये चांगले नाव केले. दोन सूतगिरणी सुरू केल्या. मात्र, त्यांच्या पुढच्या पिढीला त्या चालवता आल्या नाही. त्यांनी त्या भाड्याने दिल्या. भागधारकांना वाऱ्यावर सोडले. जिल्हा मध्यवर्ती बँक डबघाईस आणली. शेतकरी वाऱ्यावर सोडले असा आरोप आ. भोयर यांनी केला. सागर मेघे यांनी अपक्ष उमेदवार आणि चुलत बंधू यांचे नाव न घेता समज दिला. सभा संपल्यावर या दोन भाषणांची चर्चा रंगली होती.