नागपूर,
Datta Meghe M.B.A. College : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, मुंबई फेस्काॅम पूर्व विदर्भ प्रादेशिक विभाग नागपूरच्या विद्माने अत्रे लेआऊट स्थित श्री दत्ता मेघे एम.बी.ए. काॅलेज सभागृह मध्ये दिवाळी निमित्त दिपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात "करा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" या साने गुरुजींच्या प्रार्थनेने झाली.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संजीवन निसर्गोपचार केंद्र, आमगाव देवळी हिंगणा चे संचालक डॉ. संजय उगेमुगे यांनी ज्येष्ठांना सांगितले की, ज्येष्ठांनो आपली प्रकृती पैसा व संपत्तीला जपा. असा मोलाचा सल्ला दिला आणि ज्येष्ठांना आरोग्यविषयी काही टिप्स दिल्या. यावेळी कृष्णा बगडे, ज्ञानेश्वर टेकाडे, हिंगणीकर, रमेश बेलगे, रत्नाकर राऊत, बबनराव वानखडे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान फेस्काॅम अध्यक्ष सुधीर भगत यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सचिव डॉ. दीपक शेंडेकर यांनी केले. Datta Meghe M.B.A. College अहवाल वाचन प्रदीप डोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनंदा हरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष जितेन्द्र भोयर, कोषाध्यक्ष सुधीर सालफळे, प्रभाकर विंचूरकर, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला सहसचिव प्रदीप डोंगरे, मुरलीधर कुंभलकर, वामन नायगावकर, दादूजी गोखले, उद्धव वाटकर, विजय जुमडे, सुनंदा हरणे, आरती वाटकर, विणा कुकडे, कुंजलता पालेवार, डॉ. प्रकाश भातकुले, नथ्थुजी नौकरकर, श्रीराम दुरुगकर, सुरेश बोदाडे, ईश्वर वानकरआदि उपस्थित होते.
सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र