अरे देवा...भारतीय क्रिकेटपटू संजय बांगरचा मुलगा बनला मुलगी, VIDEO

    दिनांक :11-Nov-2024
Total Views |
मुंबई, 
Sanjay Bangar son became a girl माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्याद्वारे त्याच्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट समोर आली आहे. हा व्हिडिओ त्याचा हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन प्रवासाचा आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बांगरचा मुलगा आर्यनचे मुलापासून मुलीत झालेले रूपांतर दिसून येते. आर्यन बांगरने त्याच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याचे विराट, धोनी आणि त्याच्या वडिलांसोबतचे फोटो आहेत. हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन नंतर काही चित्रे देखील आहेत. 10 महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यन आता अनया बनला आहे.

Sanjay Bangar son became a girl
 
आर्यन बांगर हा देखील त्याच्या वडिलांसारखा क्रिकेटपटू आहे. तो डावखुरा फलंदाज आहे आणि इस्लाम जिमखाना या स्थानिक क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळतो. Sanjay Bangar son became a girl याशिवाय त्याने लीसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबसाठीही खूप धावा केल्या आहेत. मुलीत रुपांतर होऊन, आर्यन आता अनया बनून आनंदी आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, माझे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले. पण या खेळाशिवाय, एक प्रवास देखील आहे, जो माझ्या स्वतःच्या शोधाशी संबंधित आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील विजय हा माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.
सौजन्य : सोशल मीडिया