तेली समाज सुमित वानखेडेंच्या पाठीशी : रामदास तडस

12 Nov 2024 21:40:01
तभा वृत्तसेवा
आर्वी, 
Diwali Meeting of Teli Samaj : सुमित वानखेडे सारखा दुरदृष्टीने काम करणारा हरहुन्नरी नेता भाजपला मिळाला आहे. त्याच्यामध्ये मातृभूमीच्या विकासाची तळमळ आहे. सुमित सारख्या सोज्ज्वळ नेत्याचे हात बळकट करण्यासाठी तेली समाज पाठीशी उभा आहे. सर्व समाजाने भक्कमपणे उभे राहुन भरघोस मतांनी सुमितला विजयी करण्याचे आवाहन माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
 
 
jkhjkh
 
 
आष्टी येथे श्रद्धा मंगलम हॉल येथे आयोजित तेली समाजाच्या दिवाळी मिलनाचा कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दयानंद महाराज शिरूरकर होते तर आ. दादारावी केचे, भाजपाचे जिल्हा संयोजक सुधीर दिवे, माजी खासदार सुरेश वाघमारे, वर्धेचे माजी अध्यक्ष अतुल तराळे, अशोक विजयकर, अ‍ॅड. मनीष ठोंबरे, प्रांतिक तेली संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश काळपांडे, तालुका अध्यक्ष सुनील वंजारी, संदीप भांगे, डॉ. दुधे, मनोरा बिजवे, अजय लोखंडे, श्रीराम ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
आ. दादाराव केचे यांनी तेली समाजाची कायमच साथ भाजपाला मिळाली आहे. आर्वीत नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांच्यासाठी तेली समाजाने एकत्रित येऊन मतदान केले होते. आता सुमित वानखेडे यांच्यासाठी तेली समाजाने भक्कमपणे पाठीशी उभे राहुन त्यांचे हात बळकट करावे, असे आवाहन केले. सुरेश वाघमारे यांनी आर्वी मतदार संघही भाजपाची ताकद असल्याचे सांगून वानखेडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. सुधीर दिवे यांनी आ. केचे यांच्या विकासाला अजून चार चाँद लावण्यासाठी वानखेडे या युवा उमेवाराला निवडून देण्याचे आवाहन करून महाविकास आघाडी बिनकामाची, असे सांगितले.
 
 
वानखेडे म्हणाले की, महायुती सरकारने संताजी जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. त्यामुळे तेली समाजातील अनेकांना फायदा झाला. विषेशत: तेली समाजातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्याचा मार्ग सुकर झाला असून लाखो गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना याचा फायदाच होईल असे सांगून कमळाला विजयी करण्याची विनंती केली.
Powered By Sangraha 9.0