आकोट,
Shri Narsingh Maharaj : आकोट शहराचे व तालुक्यातील ग्रामदेवत श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सवानिमित्त शनिवार, १६ ते गुरुवार, २८ नोव्हेंबरपर्यंत श्री नरसिंग महाराज मंदिरात दररोज भजन, प्रवचन, हरिपाठ, भारुड, नाम संकीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबर रोजी श्री तीर्थ स्थापना सकाळी ९ वाजता, १८ नोव्हेंबर रोजी श्री संत मियासाहेब यांची तख्त स्थापना सकाळी ९ वाजता. तसेच कार्तिक मास काकडा आरती समाप्ती, १९ नोव्हेंबर कार्तिक श्री नरसिंग महाराज यांची पालखी श्री गुरुपुजे (संदल) करिता गुरुस्थानी उमरा ता. आकोट ( आकोट पासून 9 किलो मीटर अंतर) येथे अनंतराव देशमुख (कुटासा) यांचे प्रमुख सहभागात दुपारी १ वाजता निघेल तसेच श्री गुरुपूजेनंतर संध्याकाळी ६ वाजता अग्रसेन चौक, पोपटखेड रोड येथून श्री पालखी मिरवणूक श्री नरसिंग मंदिरात परत येईल.

२० नोव्हेंबर रोजी श्री नरसिंग महाराज यांची यात्रा (विविध धार्मिक कार्यक्रम) २१ नोव्हेंबर श्री नरसिंग महाराज यांची पालखी सकाळी ९ वाजता हभप अनंतराव देशमुख (कुटासा) यांचे प्रमुख सहभागात श्री नरसिंग मंदिरातून निघेल.व दुपारी ४ वाजता श्री पालखी मिरवणूक श्री मंदिरात परत येईल व नंतर गोपाळकाला (दहीहांडी) तसेच महाप्रसाद होईल. Shri Narsingh Maharaj २४ नोव्हेंबर कार्तिक श्री हरीनाम सप्ताहाची समाप्ती सकाळी ९ वाजता ह.भ.प. प्रभाकर बुवा सरोदे ( आकोट ) यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ११ वाजता. २७ नोव्हेंबर रोजी श्री नरसिंग महाराज समाधीस सकाळी ६ वाजता रुद्राभिषेक व सकाळी ९ वाजता श्री गाईची पूजा (गोतांबील). २८ नोव्हेंबर रोजी श्री संत मियासाहेब यांचे तख्ता समोर काकडा आरती, भजन, गोपाळकाला प्रक्षाळ पूजेचे भजन, रात्री ८ ते १० पर्यंत. श्री नरसिंग महाराज यात्रा महोत्सव झाल्यानंतर पुढील ५ बुधवार व रविवारपर्यंत सुरु राहील.