गोंदिया,
Arjuni Morgaon Assembly Constituency : सर्वच मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. मतदारसंघातील लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या, मागण्या जाणून घेत राजकुमार बडोले यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी आज मतदार संघातील देऊळगाव, येरडी, कवठा, बोळदे, कुंभीटोला बाराभाटी, मोरगाव, निलज, मालकनपुर, माहूरकुडा, सिरोली, नवनीतपूर 1, नवनीतपूर 2, महागाव, बोरी, मांडोखाल, टोला (कोरंभी), अरततोंडी, आसोली, गौरनगर, अरुणनगर, कोरंभी, जानवा, येगाव, हेटी, खामखुरा येथील नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी मनमोकळेपणे संवाद साधत नागरिकांच्या समस्या तसेच अडीअडचणी समजून घेतल्या.

ग्रामीण जनतेला दररोज भेडसावणारे प्रश्न त्याचवरोबर त्यांच्या मनातील भावना समजून घेऊन त्यांच्याशी बडोले यांनी चर्चा करून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा नागरिकांना आधार दिला. याप्रसंगी बडोले म्हणाले, सर्वधर्म समभाव आणि निष्पक्षपाती भावना मनात ठेवून मी सदैव समाजकारण आणि राजकारण करत आलो आहे. Arjuni Morgaon Assembly Constituency आज येथील सर्व नागरिकांना भेटून मला आनंद झाला, तुमच्या सुखदुःखात मी नेहमी सामील होईल, असे बडोले यांनी नागरिकांशी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. क्षेत्राला नैसर्गिक वरदान लाभले आहे, सर्व निसर्गिक संपत्तीचे संवर्धन होणे काळाची गरजेचे आहे. मतदारसंघातील नागरिकांना माझी कार्य करण्याची क्षमता आणि पार्श्वभूमी माहीत आहे. समाजकारण आणि राजकारणाचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. मला विकासाची कामे करायची आहेत. त्यामुळे मी ही निवडणूक लढवत आहे. केवळ विकासाचा दिखाऊपणा करून चालणार नाही. प्रत्यक्ष काम झाले पाहिजे. यासाठी आशीर्वाद रुपी मत देऊन विजयी करण्याचे आवाहनही बडोलेंनी नागरिकांना केले. यावेळी त्यांच्यासोबत महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.