आर्वीत घराणेशाहीला कंटाळून काँग्रेस कार्यकर्ते भाजपात

    दिनांक :15-Nov-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
तळेगाव (श्या.पंत), 
Arvi Assembly Constituency : भारतीय जनता पार्टीत विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी परीपुर्ण असून आर्वी विधानसभा क्षेत्रात सुमित वानखेडे हे विकासाची दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व आहे. त्यांचे आर्वी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय ठेवून कार्य सुरू आहे. त्यामुळे सुमित वानखेडेंच्या नेतृत्वावर अनेक पक्षीय कार्यकर्ते प्रभावित झाले आहे. काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घराणेशाहीला कंटाळून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
 
 
HJKHK
 
 
रानवाडी येथील काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अविनाश रनोटकर, दिनेश चव्हाण, रमेश चव्हाण, छगन चौहान, काशिनाथ चव्हाण अमोल उईके, राजकुमार गाडगे, योगेश कडू, सुरेश उईके आदींनी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवत व सुमित वानखेडेंच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत भाजपात रीतसर प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या दहा वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून साहूर परिसरामध्ये नावलौकिक असलेल्या नंदा कांदे यांनी देखील भाजपात प्रवेश केला. त्यामुळे आष्टी तालुक्यातीत काँग्रेसला मोठे खिंडार पडले. आष्टी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सोबत जायला इच्छुक असून अनेक कार्यकर्ते अप्रत्यक्षपणे कार्य करीत आहेत. आर्वी, आष्टी कारंजातील काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश करीत असल्याने भाजपाचा आर्वी विधानसभा क्षेत्रात वरचष्मा दिसून येत असुन विधानसभेच्या रणधुमाळीत सुमित वानखेडेंची सरशी दिसत असुन विजयाकडे घोडदौड सुरू आहे.