आद्य क्रांतिगुरू लहूजी साळवे यांची २३० वी जयंती

    दिनांक :15-Nov-2024
Total Views |
नागपूर,
Lahuji Salve Memorial Trust : "जगेल तर देशासाठी-मरेल तर देशासाठी" हा मूलमंत्र घेऊन देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक तयार करून लढा उभारणारे वस्ताद लहूजी साळवे यांच्या २३० व्या जयंतीचे आयोजन लहुजी साळवे स्मारक ट्रस्ट तर्फे लहुजी साळवे उद्यान अंबाझरी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे अध्यक्ष विनायक इंगोले होते. प्रमुख पाहूणे म्हणून बार्टी उपकेंद्राचे व्यवस्थापक अनिल वाळके, अण्णाभाऊ साठे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष लहानुजी इंगळे, प्रमुख वक्ते प्रा.राहुल हिवराडे, मुख्य मार्गदर्शक साहित्यिक चंद्रकांत वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते नरेशकुमार चव्हाण, सुचेता कांबळे, मातंग एकीकरण समितीचे अध्यक्ष बुधाजी सुरकार, ज्येष्ठ विचारवंत अरविंद डोंगरे, माजी मनपा स्थायी समिती सभापती ज्येष्ठनेते संदिप जाधव, रवींद्र वानखेडे, गुरुदास बावणे, प्रभूदास तायवाडे, किशोर तेलंग, भारत डोंगरे, उद्योजक रविंद्रन खडसे, कैलास पोटफोडे, रमेश पाडण उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.

Lahuji Salve Memorial Trust
 
प्रास्ताविक पद्माकर बावणे यांनी तर संचालन शिवशंकर ताकतोडे यांनी केले. लहुजी साळवे यांनी स्वतः च्या आखाड्यात अनेक जहाल क्रांतिकारक तयार करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांशी दोन हात करण्यासाठी सज्ज केले तर दुसरीकडे समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिल्याचे मनोगत मुख्य वक्ते प्रा. राहुल हिवराडे यांनी व्यक्त केले. Lahuji Salve Memorial Trust उपस्थित प्रमुख मान्यवरांनीही आपापले विचार व्यक्त करून लहुजी साळवे यांना अभिवादन केले. कार्यक्रमात सागर जाधव, रविंद्र खडसे, सचिन इंगोले, दुर्गेश बावणे, नितीन तायवाडे, संजय ठोसर, संगीता बावणे, कृष्णाजी खोडके, वैभव इंगोले, हर्ष इंगोले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
सौजन्य: शिवशंकर ताकतोडे, संपर्क मित्र