विदर्भात भाजपाकडून 54 टक्के जागांवर कुणबी उमेदवार

17 Nov 2024 20:18:38
तभा वृत्तसेवा
नागपूर,
Maharashtra Assembly Elections : महायुतीत विदर्भातील 62 पैकी 47 जागांवर भाजपाचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सुमारे 12 मतदारसंघ राखीव असल्याने अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना स्थान देण्यात आले. उर्वरित 35 पैकी 19 मतदारसंघांमध्ये भाजपाने कुणबी समाजातील उमेदवारांना संधी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. याची सरासरी टक्केवारी 54.28 इतकी आहे. या माध्यमातून बहुसंख्य कुणबी समाजाला लाेकसंख्येच्या प्रमाणात भाजपाने उमेदवारीत प्रतिनिधित्व देऊन सामाजिक समीकरण साधल्याचा विश्वास समाजबांधवांमधून व्यक्त हाेत आहे.
 
 
 
BJP
 
 
विदर्भात भाजपाच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघांत उत्तर नागपूर, उमरेड, आमगाव, गडचिराेली, आरमाेरी, चंद्रपूर, राळेगाव, आर्णी, उमरखेड, मेळघाट, मूर्तिजापूर, वाशीम या जागा राखीव आहेत. उर्वरित मतदारसंघांचा विचार करता नागपूर जिल्ह्यात भाजपाने पश्चिम नागपूरमधून सुधाकर काेहळे, दक्षिण नागपूरमधून माेहन मते, सावनेरात डाॅ. आशिष देशमुख, हिंगण्यात समीर मेघे यांना उमेदवारी दिली. साेबतच भंडारा जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्याविरुद्ध कुणबी समाजातील अविनाश ब्राह्मणकर यांना रिंगणात उतरविले. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी मतदारसंघात विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धक्का देण्यासाठी कृष्णलाल सहारे यांना संधी देण्यात आली.
 
 
 
सहारे यांच्या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या रॅलीतील समाजबांधवांच्या उपस्थितीने वडेट्टीवारांना ब्रह्मपुरीत तळ ठाेकण्यासाठी बाध्य केले. राजुèयात देवराव भाेंगळे तर वराेèयात करणे देवतळे लढत आहेत. वर्धा जिल्ह्यातील चारपैकी दाेन मतदारसंघांत भाजपाचे कुणबी उमेदवार वर्ध्यात पंकज भाेयर तर आर्वीत सुमित वानखेडे लढा देत आहेत. अमरावती जिल्ह्यातील तिवस्यात राजेश वानखेडे, माेर्शीत उमेश यावलकर आणि धामणगाव रेल्वेत प्रताप अडसड हे उमेदवार आहेत. अकाेला पूर्वमध्ये रणधीर सावरकर, अकाेटमध्ये प्रकाश भारसाकळे, खामगावमध्ये अ‍ॅड. आकाश फुंडकर, जळगाव-जामाेदमध्ये संजय कुटे, चिखलीत श्वेता महाले आणि वाशीम जिल्ह्यातील कारंजात सई डहाके यांना उमेदवारी दिली आहे.
 
 
विदर्भातील ओबीसी समीकरणांचा विचार करता कुणबी हा प्रमुख घटक आहे. पूर्व आणि पश्चिम विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यांमध्ये कुणबी समाजाची लाेकसंख्या अधिक आहे. यानंतर तेली, माळी, पाेवार आणि इतर समाजांचा समाजाची संख्या आहे. हीच बाब लक्षात घेऊन लाेकसंख्येच्या प्रमाणात कुणबी समाजाला उमेदवारी दिली.
 
राहुल गांधींचा हा कुठला न्याय?
 
 
काँग्रेस नेते राहुल गांधी ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचे वचन सभांमधून देत आहेत. पण, विदर्भात उमेदवारी वाटप करताना त्यांच्या पक्षातील नेत्यांना; नव्हे खुद्द त्यांनाही या बाबीचा विसर पडल्याचे दिसून येते. विदर्भात बहुसंख्य असलेल्या कुणबी समाजाला अपेक्षित संधी देण्यात आली नाही. हा कुठला न्याय आहे, अशा शब्दांत कुणबी समाजातील बांधवांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. काँग्रेसकडून मध्य नागपूर मतदारसंघात बंटी शेळके, रामटेक मतदारसंघात राजेंद्र मुळक या मराठा समाजातील उमेदवारांना कुणबी असल्याचे भासवून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संतापही समाजबांधवांकडून व्यक्त हाेत आहे.
 
 
पटाेले, वडेट्टीवारांविरुद्ध भाजपाचे ‘कुणबी अस्त्र’
 
 
विदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले आणि विराेधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे दाेन माेठे नेते आहेत. या दाेन्ही नेत्यांच्या मतदारसंघात भाजपाने अविनाश ब्राह्मणकर आणि कृष्णलाल सहारे यांच्या रूपाने कुणबी उमेदवार दिले आहेत. पटाेलेंच्या साकाेलीत कुणबी विरुद्ध कुणबी अशी थेट लढत हाेत आहे. पटाेले यांनी समाजासाठी आजवर काय केले, असा सवाल करीत कुणबी समाज आपल्या भावना व्यक्त करीत असल्याने ब्राह्मणकर यांना समाजाचे बळ मिळू लागल्याचे चित्र आहे.
Powered By Sangraha 9.0