नागपूर,
Agro Vision 2024 दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शन २२ ते २५ नोव्हेंबरपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची जोडधंद्याची माहिती व्हावी, त्याचा उपयोग त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व्हावा तसेच त्यांची शेती लाभदायक व्हावी. या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन पीडीकेव्ही, दाभा मैदानावर आयोजित केले जाणार असल्याची माहिती ऍग्रोव्हिजनचे आयोजन सचिव रवी बोराटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१५ व्या ऍग्रो Agro Vision 2024 व्हिजन कृषी प्रदर्शनाची सुरुवात शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात येईल. यावेळी, केंद्रीय मत्स्यव्यवसाय,पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग,मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव तसेच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते तसेच ऍग्रो व्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ऍग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाची यावर्षीची संकल्पना शेतकरी सक्षमीकरणासाठी यंत्र,तंत्र व व्यापार वाढीचे मंत्र अशी राहणार आहे.
यावर्षी, ऍग्रोव्हिजन मध्ये विदर्भातील दुग्ध व्यवसाय वाढीच्या संधीवर एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद एनडीडीबीच्या (NDDB - राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड)सहकाऱ्याने आयोजित करण्यात येणार आहे. या दुग्धविकास परिषदेला ५००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या परिषदेला केंद्रीय पशुपालन व डेअरी विभागाच्या सचिव डॉ. अलका उपाध्याय, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे महाव्यवस्थापक मिनेश शहा व मदर डेअरीचे संचालक मनीष बंदलीश यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
४०० हून अधिक Agro Vision 2024 कंपन्यानी आपला सहभाग ऍग्रो व्हिजन मध्ये निश्चित केला आहे.भारतातील कृषी उत्पन्नाचे उत्पादन करणाऱ्या अनेक नामवंत कंपन्या,संशोधन संस्था,सरकारी विभाग, विविध राज्य व कृषी विद्यापीठ या प्रदर्शनात त्यांचे तंत्रज्ञान सादर करतील. याशिवाय, देशातील प्रगत कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि सेवा क्षेत्रातील आघाडीच्या संस्थाही या कृषी प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
यावर्षीच्या, ऍग्रो Agro Vision 2024 व्हिजन मध्ये एकूण ४१ विविध विषयावर कार्यशाळा आयोजित केल्या जातील. या कार्यशाळांमध्ये शेतकऱ्यांना देशभरातील तज्ञांचे मार्गदर्शन आणि यशस्वी शेतकऱ्यांकडून शिकण्याचे अनोखी संधी मिळेल. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनेक विषयांचा समावेश यावर्षी कार्यशाळांमध्ये करण्यात आला आहे. यात कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर,फुलशेती,भाजीपाला बियाणे उत्पादन, हळद आणि आलं लागवड प्रक्रिया,बांबू लागवड, औषधी वनस्पती लागवड तंत्रज्ञान, कृषी रसायनांचा योग्य वापर, तेलबिया उत्पादन,रेशीम शेती,शेळी मेंढी पालन,मधमाशी पालन, नैसर्गिक शेती, विदर्भातील ॲग्रो टुरिझमच्या संधी कुक्कुटपालन यासारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे.
याशिवाय, ऍग्रो व्हिजन मध्ये काही विशेष कार्यशाळा देखील आयोजित केल्या आहेत. त्यामध्ये, उसाच्या लागवडीसाठी तंत्रज्ञान कार्यशाळा शनिवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता, कृषी क्षेत्रा तरुणांचा सहभाग या विषयावर कार्यशाळा दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
रविवार Agro Vision 2024 २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विदर्भातील अन्नप्रक्रिया संधी आणि दुपारी २ वाजता शेतकरी उत्पादक संघटनावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.तसेच, सोमवार २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संत्रा उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान व दुपारी १.३० वाजता विदर्भातील मत्स्य व्यवसायावर कार्यशाळा होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कृषी प्रदर्शनाला शेतकरी वर्गासोबत सर्वसामान्य जनतेने सोबतच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आयोजन समितीद्वारे यावेळी करण्यात आले.