डॉ. बारहाते एलआयटी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू

02 Nov 2024 19:51:43
नागपूर, 
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू Dr. Milind Barhate डॉ. मिलिंद बारहाते यांनी एलआयटी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे तत्कालीन संचालक डॉ. राजू मानकर यांची एक वर्षापूर्वी एलआयटी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ १ नोव्हेंबर २०२४ रोजी संपल्यानंतर विद्यापीठाच्या माजी कुलपतींच्या निर्देशानुसार डॉ. मिलिंद बारहाते यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे. राज्यपाल व एलआयटी विद्यापीठाचे कुलपती यांच्या आदेशानुसार, एलआयटी विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत डॉ. बारहाते हे कुलगुरू म्हणून काम पाहतील.
 
 
Dr. Milind Barhate
 
Dr. Milind Barhate डॉ. बारहाते यांचे स्वागत एलआयटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. निरज खटी यांनी केले. यावेळी वित्त व लेखाधिकारी शिल्पा पांडे, बीआरआयएलच्या संचालक डॉ. प्रतिभा अग‘वाल, सीओई डॉ. प्रदीप शेंडे, स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीच्या अधिष्ठाता डॉ. अर्चना मून, स्कूल ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. गिरीश देशमुख, बोर्ड ऑफ स्टुडंट डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. नरेश पाटील, केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. संजय शिरसाट, जनसंपर्क अधिकारी डॉ. सौरभ जोगळेकर, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 
 
एलआयटी विद्यापीठाचे सल्लागार मोहन पांडे, बोर्ड ऑफ गव्हर्नसन्सचे कुलपती नामनिर्देशित सदस्य उत्कर्ष खोपकर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, एलआयटी विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0