उमेदवारांना १९६ चिन्हांचे पर्याय

    दिनांक :02-Nov-2024
Total Views |
- चिन्हांमध्ये वाढ; नाविण्यही वाढले
 
मुंबई, 
राजकीय पक्षांची उमेदवारी नसल्यास अपक्ष म्हणून लढताना उमेदवारांचा मतदारांवर प्रभाव पडेल किंवा त्यांच्या लक्षात राहील, असेच Election symbol निवडणूक चिन्ह मिळविण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंत पारंपरिक चिन्ह जास्त असल्याने त्यात निवडीला वाव नसायचा. त्यात अपक्षांची संख्या जास्त तर महत्त्वाचे चिन्ह मिळवायची मोठी स्पर्धा असायची. काही चिन्ह तर शिट्टी, कुकर, पतंग अशी काही असायची. खेळणी वाटत असल्याने उमेदवारांचा कल नसायचा. मात्र, आता घसघशीत १९६ चिन्हांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे, फक्त चिन्हच वाढलेली नाहीत, तर त्यात नाविण्यही आले आहे.
 

Election 
राष्ट्रीय पक्ष वाढले
Election symbol राष्ट्रीय व राज्य पक्षांची वाढलेल्या पक्षांमुळे यावेळी पक्षांच्या चिन्हात वाढ झाली आहे. पारंपरिक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (पंजा), भारतीय जनता पार्टी (कमळ), राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कनीस-विळा), शिवसेना (धनुष्यबाण), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (इंजिन), बहुजन समाज पार्टी (हत्ती) या पारंपरिक चिन्हांत आता तृणमूल काँग्रेस (फुल-गवत), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (हातोडा-विळा-तारा), नॅशनल पीपल्स पार्टी (पुस्तक) पक्षांच्या चिन्हांची भर पडली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा निवडणूक चिन्हांत समावेश झाला आहे. त्यात सीसीटीव्ही, बेबी वॉकर, पेन स्टॅण्ड, रूम कुलर, स्विच बोर्ड, भेटवस्तू, टूथ पेस्ट, इंजेक्शनची सिरीन, दुर्बीण, कॅमेरा, बॅटरी, सायकलचा पंप, क्रेन अशा नानाविध वस्तूंसोबत कालबाह्य झालेले दळण दळायचे जाते, बांगड्या, चपला, हार, हिरा, कढई, फोन चार्जर, प्रेशर कॅमेरा, बुद्धिबळ, हेल्मेट, पत्रपेटी ट्रक, ट्रॅक्टर, मोत्यांचा हार, बॅटरी, बूट, मोजे अशी चिन्हेदेखील आयोगाने उपलब्ध करून दिली आहेत.
 
 
Election symbol चाळणीपर्यंत घरगुती वस्तूंना निवडणूक चिन्हांत स्थान मिळाले आहे. घरगुती वस्तूंशिवाय सार्वजनिक वस्तूंची रेलचेल आहे. त्यात कपाट, एअर कंडिशनर, फुगा, बांगड्या, फलंदाज, दुर्बीण, विटा, कोट, झगा, फुटबॉल, विजेचा खांब, ऊस शेतकरी, गॅस हॅट, किटली, चावी, काडेपेटी, लायटर, नेलकटर, गळ्यातील टाय, तंबू, करवत, जेवणाचे ताट, मटार, अननस आदी विविध प्रकारची १९६ मुक्त चिन्हे अपक्षांना उपलब्ध आहेत.