डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि इस्लाम!

Dr.B.R.Ambedkar-Islam बाैद्ध धर्म भारतीय संस्कृतीचा भाग

    दिनांक :20-Nov-2024
Total Views |
इतस्तत:
 
 
 - विवेक राजे
 
 
 
Dr.B.R.Ambedkar-Islam या देशात काेणत्याही प्रदेशात विधानसभा किंवा लाेकसभेची निवडणूक लागली की, सगळ्या राजकीय पक्षांना आणि त्यांच्या अधिकृत, अनधिकृत, स्वयंघाेषित प्रवक्त्यांना अचानक अनेक गाेष्टी आठवायला लागतात. अनेकदा अशा अनेक गाेष्टींना कागदाेपत्री, ऐतिहासिक असा आधार असताे. अनेकदा असा आधार नसताे. अनेकदा ऐतिहासिक सत्याचा अपलाप केला जाताे. अनेकदा ऐतिहासिक घटना वा कागदपत्रांच्या विश्लेषणाला अर्थाऐवजी अनर्थाचे स्वरूप येते. Dr.B.R.Ambedkar-Islam हे सगळं करण्यात डाव्या विचारसरणीच्या लाेकांचे काैशल्य वाखाणण्याजाेगे आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात काही मुसलमान काही काळ हाेते. ते का हाेते, किती काळ हाेते यासारख्या गाेष्टींचा विचार न करता, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे ‘गाेब्राह्मण प्रतिपालक’ अशी उपाधी असलेल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सेक्युलर वा सेक्युलॅरिझम वगैरे संकल्पनाही अस्तित्वात नसलेल्या काळातील छत्रपती शिवाजी महाराजांना चक्क सेक्युलर ठरवण्याचे काैशल्य फक्त डाव्या विचारसरणीच्या लाेकांनाच अवगत असल्याचे दिसते.Dr.B.R.Ambedkar-Islam
 
 
 

Dr.B.R.Ambedkar-Islam 
 
 
 
अशाच प्रकारची एक मल्लिनाथी कुणा एका मुस्लिम माैलवींनी केली आहे आणि ती सगळीकडे वादाचा विषय झालेली दिसते. हा मुस्लिम माैलवी असे सांगताे की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बाैद्ध धर्माची दीक्षा घेण्याची घाेषणा केली तेव्हा त्यांना मुस्लिम धर्मात प्रवेश करण्याचे आमंत्रण देण्यात आले हाेते. तेव्हा थाेडक्यात चुकले; नाही तर आज ‘भीम-मीम’ची घाेषणा देण्याची गरजच पडली नसती. निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेक नॅरेटिव्हज पसरविले जातात. या नॅरेटिव्हजचा घडलेल्या इतिहासाशी वा भविष्याशी काहीही संबंध नसताे. Dr.B.R.Ambedkar-Islam वास्तविक, भारतातील बाैद्ध पंथाच्या ऱ्हासाची कारणे देताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः असे म्हणतात की, मुस्लिम आक्रमकांनी बाैद्ध धर्मीयांच्या सरसकट केलेल्या कत्तली, ऐहिक जीवनाविषयीची उदासीनता आणि जगभरात प्रसार करण्याच्या प्रयत्नात प्रांतिक स्तरावर केंद्र स्थापित केले न जाणे, ही महत्त्वाची कारणे हाेत. म्हणजे बाैद्ध धर्माच्या ऱ्हासासाठी डाॅ. आंबेडकरांच्या मते हिंदू धर्म कारणीभूत नव्हता.
 
 
 
 
 
 
बाबासाहेब आंबेडकरांच्या धनंजय किर लिखित चरित्रातील पुढील काही संदर्भ इस्लामच्या बाबतीतील बाबासाहेबांच्या विचारांचा मागाेवा घेण्यासाठी पुरेसे आहेत. Dr.B.R.Ambedkar-Islam ‘‘राज्यघटना तयार करून देशाला अर्पित केल्यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा घटनेचे शिल्पकार म्हणून भारतभरात गाैरव केला गेला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या लाेकांना ‘सर्व देशाचे हित आणि उन्नती या दृष्टीने विचार करावा’ असा उपदेश केला.’’ देशाचा विचार याचा अर्थ सर्व देशांतील लाेकांच्या उन्नतीचा विचार. असा विचार करणारा आणि उपदेश करणारा माणूस या देशाच्या रास्त परंपरा, संस्कृती, विविधता, स्वातंत्र्य यांचा बळी देऊन एकारलेले तत्त्वज्ञान सांगणाऱ्या संस्कृती आणि श्रद्धा आमच्यावर लादण्याचा सातत्याने सशस्त्र प्रयत्न करणाऱ्या  इस्लामचा विचार कधीही करणार नाहीत. दिल्लीत एका सभेत बाेलताना ते म्हणाले की, ‘‘बुद्धाखेरीज सर्व धर्म संस्थापकांनी आपण माेक्षदाते आहाेत, ही भूमिका घेतली आणि स्वतः स्खलनातीत आहाेत, अशी ग्वाही दिली.
 
 
 
 
 
Dr.B.R.Ambedkar-Islam उलटपक्षी बुद्धाने आपल्याकडे मार्गदर्शकाची भूमिका पत्करली.’’ याचा अर्थ बाबासाहेबांना ‘माेक्ष’ ही संकल्पना मान्य आहे. माेक्ष प्राप्तीसाठी असलेले विविध मार्गदेखील त्यांना मान्य आहेत तसेच या मार्गाच्या निवडीचे स्वातंत्र्य त्यांना अभिप्रेत हाेते. मार्ग ज्याचा त्याने निवडायचा असताे, काेणीही माेक्षदाता असत नाही, असे त्यांचे मत हाेते. मग जे धर्म आणि त्यांचे प्रेषित ‘जन्नत’ आणि ‘कयामत की रात’, ‘पाप पुण्याचा निवाडा’ आणि ‘आम्ही सांगताे ताेच मार्ग’ असा अतिरेकी अट्टाहास करणाऱ्या काेणत्याही धर्मात प्रवेश करण्याचा विचार कसे काय करू शकतील, याचा लाेकांनी विचार केला पाहिजे. Dr.B.R.Ambedkar-Islam 14 ऑक्टाेबर 1956 राेजी सकाळी 9 ते 11 या वेळेस आपण नागपूर येथे बाैद्ध धर्माची दीक्षा घेणार असल्याची डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घाेषणा केली. त्या आधी, म्हणजे 13 ऑक्टाेबर 1956 च्या संध्याकाळी, पत्रकारांशी वार्तालाप करताना, एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, ‘‘अस्पृश्यांच्या प्रश्नावर गांधीजींशी चर्चा करताना मी त्यांना म्हणालाे की, अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी तुमच्याशी माझे मतभेद असले, तरी वेळ येईल तेव्हा मी देशाला कमीत कमी धाेका लागेल, असा मार्ग स्वीकारेन. म्हणून बाैद्ध धर्म स्वीकारून मी या देशाचे जास्तीत जास्त हित साधत आहे. कारण बाैद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. या देशाची संस्कृती, इतिहास यांच्या परंपरेला धाेका लागणार नाही, अशी मी खबरदारी घेतली आहे.’’
 
 
 
 
 
भारतीय लाेक, संस्कृती, परंपरा यांच्या विषयीची पाेटातून कळकळ असलेला माणूस या सगळ्या गाेष्टींना धाेका निर्माण करण्याचा विचारही करू शकत नाही. बाबासाहेबांच्या चरित्राकडे नजर टाकली तरी या देशातील लाेकांविषयी त्यांना असलेली कळकळ सहजपणे लक्षात येते. Dr.B.R.Ambedkar-Islam त्यामुळे बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारण्याचा विचारही कधीच केला नसेल, हे नक्की. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काँग्रेस व गांधींच्या मुस्लिम तुष्टीकरण धाेरणाचा संदर्भ देऊन असे लिहितात की, ‘‘गांधींनी मुस्लिमांना हिंदूंच्या विरुद्ध गंभीर गुन्ह्यांमध्ये दाेषी असतानाही, कधीही दाेष दिला नाही वा जाब मागितला नाही.’’ स्वामी श्रद्धानंद आणि इतरांच्या हत्येचा हवाला देत डाॅ. आंबेडकर लिहितात की, ‘‘किती हिंदूंची हत्या झाली आहे, हे महत्त्वाचे नसताना, मुस्लिम धर्मातील मुखंडांनी या कृत्यांचा कधीही निषेध केला नाही.’’ ते लिहितात की, ‘‘गांधींनी माेठ्या प्रमाणातील माेपला हिंसाचाराला जेव्हा ते म्हणाले की, धाडसी देवभिरू माेपला; ज्याला ते धर्म मानतात आणि ज्याला ते धार्मिक मानतात त्यासाठी लढत हाेते. हिंदूंमध्ये धैर्य आणि विश्वास असणे आवश्यक आहे. असा धर्मांध उद्रेक हाेऊनही ते म्हणजे हिंदू आपल्या धर्माचे रक्षण करू शकतात असे वाटते, तेव्हाच माफ केले हाेते.
 
 
 
 
  
Dr.B.R.Ambedkar-Islam जे बाबासाहेब गांधींच्या मुस्लिमधार्जिण्या धाेरणावर थेट टीका करतात आणि टीका करताना इस्लाममधील विकृतीवर कटाक्ष टाकतात ते कधीतरी इस्लाम धर्मात प्रवेश करण्याचा विचार करतील, असे वाटत नाही. देशाच्या फाळणीच्या वेळी गांधीजींच्या, इथल्या मुसलमानांनी इथेच म्हणजे भारतातच राहावे आणि पाकिस्तानातील हिंदूंनी पाकिस्तानातच राहावे, या घाेषणेला वा आग्रही प्रतिपादनाला झडझडून विराेध करताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण लाेकसंख्येची सुनियाेजित अदलाबदल करण्याची सूचना केली हाेती. तेव्हाही भारतातील मुस्लिम सुरक्षित राहतील, पण पाकिस्तानातील हिंदूंच्या सुरक्षिततेला निश्चित धाेका निर्माण हाेईल, याची त्यांना खात्री हाेती. Dr.B.R.Ambedkar-Islam त्यामुळेच ते लाेकसंख्येच्या अदलाबदलीच्या प्रतिपादनावर शेवटपर्यंत ठाम राहिले. इस्लामची आक्रमकता, त्या धर्मातील दार-अल-इस्लाम आणि दार-अल-हरब या संकल्पना तसेच फक्त माेमिनांनाच जीवित राहण्याचा असलेला हक्क हे माहिती असल्याने तसेच स्वप्नाळू राजकारण न करता व्यवहारी दृष्टिकाेन असलेले ते राजकारणी असल्यामुळे तेथील हिंदूंच्या सुरक्षिततेची त्यांना वाटणारी कळकळ त्यांच्या सूचनेमधून सहजपणे लक्षात येते.
 
 
 
 
मुस्लिम समाजातील स्त्रियांची स्थिती, पर्दा विषय, इस्लाममध्ये नसलेले उपासना स्वातंत्र्य व स्त्रियांची गुलामगिरी याबाबत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी उल्लेख केलेला आहे. ते लिहितात, मुसलमानांना राजकारणात रस नाही. त्यांचे प्रमुख स्वारस्य धर्म हेच आहे. मुस्लिम मतदार, उमेदवाराचा कार्यक्रम तपासण्याची पर्वा करत नाही. मतदाराला उमेदवाराकडून एवढीच इच्छा आहे की, त्यांनी मशिदीचे जुने दिवे बदलून नवीन दिवे लावावेत, मशिदीसाठी नवीन चटई द्यावी किंवा मशिदी जीर्ण झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करावी. Dr.B.R.Ambedkar-Islam डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या देशहिताची तळमळ असलेल्या माहात्म्याविषयी सत्याचा अपलाप करणे म्हणजे, केवळ संख्यात्मकदृष्ट्या वरचढ ठरण्यासाठी, निवडणुकांमध्ये विजय मिळवून इस्लामधार्जिणे कायदे तयार करून घेण्यासाठी सगळ्या जगाला (अल तकिया) धाेका देत, दलित-मुस्लिम ऐक्याच्या नावाखाली इस्लामी वर्चस्ववादी जमावाच्या संगनमताने डाव्या मीडियाने रचलेला खाेटेपणा हाेय.
 
 
9881242224