गयानात मोदींचे भारतीय समुदायाकडून उत्साही स्वागत

20 Nov 2024 19:46:12
- ५० वर्षांनंतर प्रथमच भारतीय पंतप्रधानांचा दौरा
 
जॉर्जटाऊन, 
तीन देशांच्या दौर्‍यावर असलेले PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी रात्री उशिरा ब्राझीलहून निघाल्यानंतर पहाटे येथे आले आणि हॉटेलमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. भारतीयांना येथे विविध क्षेत्रांमध्ये छाप पाडताना पाहून आनंद झाल्याचे सांगितले आणि त्याचे कौतुक केले. येथील अनेक भारतीय १८० वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी स्थलांतरित झाले होते. कोणत्याही पंतप्रधानाने येथे ५० वर्षांहून अधिक कालावधीनंतर केलेला हा पहिला दौरा आहे. गयानामध्ये भारतीय वंशाचे सुमारे ३,२०,००० नागरिक आहेत. ज्यात १८५ वर्षांपूर्वी येथे स्थायिक झालेले अनेक लोक आहेत.
 
 
Gayana
 
भारतीय वंशाच्या लोकांव्यतिरिक्त, सुमारे हजार भारतीय नागरिक आहेत. गयानामधील भारतीय समुदायाचे त्यांच्या हार्दिक आणि उत्साही स्वागताबद्दल मनःपूर्वक आभार. मुळाशी जोडलेले राहण्यासाठी अंतर हा कधीच अडथळा नसतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे. विविध क्षेत्रांमध्ये समाजाचा ठसा उमटवताना पाहून आनंद झाला, असे पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर पोस्ट केले. गयानाच्या अनेक कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत भारतीय समुदाय आणि समुदायाकडून पंतप्रधानांचे उत्साही स्वागत करण्यात आले, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. भारतीय नागरिक पारंपरिक वेशभूषेत होते आणि त्यांच्यापैकी अनेकांनी हातात भारतीय तिरंगा घेतलेला दिसत होता. यावेळी उपस्थितांनी ‘मोदी मोदी’ अशा घोषणा दिल्या. त्याचवेळी एका भारतीयाने PM Narendra Modi मोदी यांचे बनवलेले स्केचही मोदींना सादर करण्यात आले.
स्वागतासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर
अभूतपूर्व जल्लोषात PM Narendra Modi पंतप्रधान मोदींचे विमानतळावर गयानाचे राष्ट्रपती इरफान अली, पंतप्रधान मार्क अँथनी फिलिप्स आणि डझनभर कॅबिनेट मंत्र्यांनी स्वागत केले. तसेच हॉटेलमध्ये ग्रेनेडाचे पंतप्रधान डिकॉन मिशेल आणि बार्बाडोस मिया अमोर मोटली यांनीही मोदींचे स्वागत केले. भारत-गयाना घनिष्ठ संबंधांचा दाखला म्हणून मोदींना ‘की टू द सिटी ऑफ जॉर्जटाऊन’ देखील सुपूर्द करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0