नवी दिल्ली,
Mahakumbh Melawa 2025 : इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम काॅर्पाेरेशन लिमिटेड पुढील वर्षीच्या महाकुंभ मेळ्याच्या अनुषंगाने प्रयागराज येथे टेंट सिटी विकसित करण्यासाठी सज्ज आहे. ‘महाकुंभ ग्राम’ ही तीर्थक्षेत्र आणि पर्यटन लॅण्डस्केपमध्ये एक परिवर्तनकारी जाेड असेल. यात आलिशात निवास व्यवस्था आणि भारताच्या आध्यात्मिक विविधतेचा उत्सव साजरा करणाèया सांस्कृतिक विसर्जित अनुभवाचा समावेश असेल, असे आयआरसीटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार जैन म्हणाले.
सर्व अभ्यागतांसाठी प्रवेशजाेगी, आरामदायी आणि समृद्ध अनुभव प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे, असे जैन यांनी म्हटले आहे. आयआरसीटीसी कुंभग्रामला एक अतुलनीय आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळ बनविण्याच्या प्रयत्नात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. महाकुंभ ग्राम टेन्ट सिटीला थेट बुकिंग तसेच आयआरसीटीसी पर्यटकांना रेल्वे टूर पॅकेजेस, भारत गाैरव ट्रेन्स इत्यादीद्वारे संरक्षण दिले जाईल, असे ते म्हणाले.