बजाजनगरात संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा

21 Nov 2024 19:02:31
नागपूर,
Sant Dnyaneshwar Sanjivan Samadhi Ceremony : बजाजनगर येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे व स्पर्धाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अविनाश संगवई यांनी दिली आहे. सर्व वयोगटांसाठी विविध असून यात प्रामुख्याने २४ नोव्हेबर रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
dhnyaneswar-mandir
 
 
संतांची चित्रे किंवा त्यांचे जीवन प्रसंग या विषयावर चित्रे काढायची असून चित्रासाठी कागद २१ नोव्हेंबर दिल्या जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा, हरिपाठाचे पाठांतर स्पर्धेत पहिले ३ ते १२ श्लोकांपैकी कोणतेही २ श्लोक विद्यार्थ्यांना सादर करावयाचे आहे. वाचन स्पर्धा, संतांच्या गोष्टीवर आधारित कथाकथन स्पर्धा सायंकाळी ५ ते ६ या वेळात घेतल्या जाणार आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या जीवन पटावर संगितिका बजाजनगरचे कलाकार सादर करतील. तर २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. हरिपाठ नीता पांडे सादर करतील. याशिवाय २७ नोव्हेंबर रोजी अभंग व भावगीत, नाट्यगीतांचा कार्यक्रम होईल.
 
 
संत ज्ञानेश्वर महाराज माऊली यांचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा निमित्त २८ रोजी पसायदानावर चारुल अनिखिंडी या कथक नृत्य सादर करतील. गोपालकाल्याचे कीर्तन २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वा. चैतन्य देशपांडे सादर करतील. संत ज्ञानेश्वर मंदिर समागृह, बजाज नगर येथे सर्व कार्यक्रम होणार असून कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन श्रेया टाकळकर, तरासे, सुवर्णा बापट, नेत्रा लाखे, रेखा साळुंखे, अशोक गुजरकर, राजेंद्र खापे, शरद राठी, उमेश अनिखिंडी, संध्या अययर आदींनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0