नागपूर,
Ahilya Bai Holkar : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कर्तृत्वाची, निष्ठेने आणि अत्यंत कुशलतेने केलेल्या राज्यकारभाराची तसेच धर्माधिष्ठित न्यायव्यवस्थेने कार्य करण्याची गाथा सर्वांना पुन्हा एकदा कळावी या उद्देशाने मानिनी बहुउद्देशीय संस्था निर्मित आणि नटराज आर्ट्स ऍण्ड कल्चर सेन्टर नागपूर द्वारा प्रस्तूत "कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर" या एकपात्री प्रयोगाचे आयोजन रविवार दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता धरमपेठ येथील नटराज आर्ट्स ऍंड कल्चर सेन्टर येथे केले आहे.
याचे लेखन डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी केले असून, याचे सादरीकरण नागपुरातील जाणत्या अभिनेत्री डॉ. दीपलक्ष्मी दिलीप भट करणार आहे. दिग्दर्शन, नेपथ्य स्वप्निल बोहटे यांचे असून, संगीत अनिल इंदाणे यांचे आहे तर प्रकाशयोजना वैदेही चवरे यांची असेल. Ahilya Bai Holkar कार्यक्रमाला धरमपेठ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उल्हास औरंगाबादकर विशेषत्वाने उपस्थित राहणार आहेत. अत्यंत प्रभावीपणे सादर होणाऱ्या या सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आयोजकांनी आव्हान केले.
सौजन्य: स्वप्निल बोहाटे, संपर्क मित्र