मुंबई,
Sana Khan Pregnancy Announcement : बॉलिवूड अभिनेत्री सना खानने वर्षभराच्या आत दुसऱ्यांदा गुड न्यूज दिली आहे. सना खान पुन्हा एकदा आई होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने दुसऱ्या प्रेग्नेंसीची माहिती दिली आहे. अभिनेत्रीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसची बातमी समोर येताच सनावर तिच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव सुरु केला आहे. सना खान आणि तिचा पती अनस सय्यद यांनी एक व्हिडिओ शेअर करून आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'अल्लाहच्या आशीर्वादाने आमचे तीन जणांचे कुटुंब आता चार जणांचे होणार आहे. अलहमदुलिल्लाह, आमचा छोटा पाहुणा येणार आहे. सैयद तारिक जमील मोठा भाऊ होण्यासाठी उत्सुक आहे असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दुसऱ्या मुलासाठी आनंदी
या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'हे अल्लाह, आम्ही आमच्या नवीन आनंदाचे स्वागत करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. आम्हाला तुमच्या प्रार्थनेत ठेवा. Sana Khan Pregnancy Announcement अल्लाह आम्हाला आशीर्वाद द्यावेत, धन्यवाद. या व्हिडिओसोबत सना खानने कॅप्शनमध्ये एक लांबलचक नोटही लिहिली आहे.
सना खानने २०२३ मध्ये दिला पहिल्या मुलाला जन्म
अभिनेत्री सना खानला बिग बॉसमधून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. सना खानने सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. सना खानला 'बिल्लो रानी' या गाण्यातून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. Sana Khan Pregnancy Announcement त्यासोबतच ती 'वजह तुम हो' आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटात देखील दिसली होती. त्यानंतर सना खानने २१ नोव्हेंबर २०२१ रोजी सूरतमध्ये मुफ्ती अनस सैयदसोबत लग्न केले. ५ जुलै २०२३ रोजी सना खानने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. ज्याचे नाव सैयद तारिक जमील असं आहे. अशातच आता सना खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. सोशल मीडियावर देखील लोक तिला सर्च करत आहे. मोठ्या प्रमाणात सना खानचा चाहता वर्ग आहे.