Batuk Bhairav Temple तुम्ही भगवान शिवाची अनेक मंदिरे पाहिली असतील. पण असे एक ठिकाण आहे जिथे भोलेनाथाचे मंदिरही आहे व तिथे त्यांची बालस्वरूपात पूजा केली जाते. एवढेच नाही तर त्यांना लहान मुलाप्रमाणे टॉफी, चॉकलेट व बिस्किटेही दिली जातात.अनेकदा लोक भगवान शंकराच्या मंदिरात गायीचे दूध, बेलाची पाने, भांग आदी अर्पण करतात. पण एक अनोखे मंदिर आहे जिथे देवाला चॉकलेट,बिस्किटे, नमकीन व लाडूचा नैवैद्य दाखवतात.या वस्तू देवाला अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात अशी लोकांची श्रद्धा आहे. यासोबतच, व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे मंदिर कुठे आहे व त्यासंबंधीच्या श्रद्धा जाणून घेऊया.
हे मंदिर कुठे आहे?
शिवाची नगरी Batuk Bhairav Temple म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीमध्ये भोलेनाथाचे हे अनोखे मंदिर आहे. काशीला मंदिरांचे शहर म्हटले जाते. वास्तविक या शहराच्या कानाकोपऱ्यात भगवान शिव विराजमान आहेत. याशिवाय, येथे अनेक देवी-देवतांची मंदिरे आहेत. त्यातील एक बटुक भैरवाचे मंदिर कमच्छा येथे आहे. बटुक भैरव हे भगवान शंकराचे बाल म्हणून ओळखले जातात.
चॉकलेट्स व बिस्किटांचे लाड
या मंदिरात Batuk Bhairav Temple बटुक भैरवाची पूजा केली जाते. ज्यात बटुक म्हणजे मूल. काशीच्या बटुक भैरवाचे वय ५ वर्षे सांगितले जाते. ज्याप्रमाणे, लोक लहान मुलावर प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात, त्याचप्रमाणे, तेथे येणारे भाविक बटुक भैरवाला टॉफी, चॉकलेट, बिस्किटे आदी अर्पण करतात. असे गेल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
त्रास दूर होतात
भगवान बटुक Batuk Bhairav Temple भैरवाच्या दर्शनाने सर्व प्रकारचा शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होतात, अशीही मान्यता आहे. याशिवाय, कुंडलीतील राहू व केतूच्या त्रासातूनही आराम मिळतो. एवढेच नाही तर बाहेरची बाधा संबंधित समस्याही त्यांच्या दर्शनाने दूर होतात.
या गोष्टींनाही दाखवतात नैवेद्य
बटुक भैरव Batuk Bhairav Temple मंदिरात दिवसभर बिस्किटे, फराळ, चॉकलेट, लाडू इत्यादींचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी, महाआरतीनंतर, त्यांना भैरवाच्या रूपात मटण करी, चिकन करी, फिश करी व ऑम्लेटसह दारू अर्पण केले जाते.