महायुतीचे इंद्रनील नाईक यांचा विक्रमी विजय..!

24 Nov 2024 19:15:53
- ९१ हजार ८३२ मतांची आघाडी

पुसद, 
पुसद विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवार Indranil Naik इंद्रनील मनोहर नाईक यांचा विक्रमी विज झाला. त्यांनी मविआचे शरद पवार उमेदवार शरद मैंद यांचा ९१ हजार ८३२ मतांनी पराभव केला. इंद्रनील नाईक यांना १ लाख २७ हजार ९६४ ते मिळाली. तर शरद मैंद यांना ३७ हजार १९५ मते मिळाली तर तिसरे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे माधव वैद्य यांना ३६ हजार ५७५ मते मिळाली. इंद्रनील नाईकांचा हा विदर्भात विक्रमी मताधिक्याने येण्याचा विक्र आहे.

indra
विद्यमान आमदार Indranil Naik इंद्रनील नाईक यांच्या विजयासाठी महायुतीमधील भाजपा, शिवसेनेसह इतरही सहयोगी पक्षांनी प्रचंड मेहनत घेतली हे येथे उल्लेखनी. पुसद मतदारसंघात २ लाख ११ हजार ८३६ एवढे विक्रमी मतदान झाले. हासुद्धा एक निवडणुकीच्या इतिहासातील विक्रम आहे. इंद्रनील नाईक विजयी होताच नाईक बंगल्यावर ढोलताशांसह समर्थकांनी एकच जल्लोष केला. आभार मानण्यासाठी इंद्रनील नाईक आणि मोहिनी नाईक सामोरे गेले. नाईक घराण्यावरील नितांत प्रे व विश्वासाचा हा विजय आहे. मित्रपक्ष भाजपा व शिवसेना तसेच रिपाई आठवले व इतर समाजातील सर्व घटकांनी भरघोस मतदान केल्याने हा विक्रमी विजय झाल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
टायगर अभी जिंदा है..!
Indranil Naik इंद्रनील नाईक विक्रमी मताधिक्क्याने विज होताच चौका-चौकात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच विक्रमी विजयाचे बॅनर लावले. बॅनरवर मनोहर नाईकांच्या छायाचित्रासह ‘अभी टायगर जिंदा है..!’ असे झळकले आहे. ग्रामीण भागातील गाव-तांड्यात ढोलताशे वाजवून जल्लोष करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0