- हिंदूंचा आवाज बुलंद केल्याने कारवाई
ढाका,
ISKCON's Chinmaya Prabhu arrested बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात वाढत्या अत्याचारांच्या वृत्तांदरम्यान चटगाव इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णन् दास (चिन्मय प्रभू) यांना अटक करण्यात आली. ढाका पोलिसांच्या गुप्तचर शाखेच्या अधिकार्यांनी चिन्मय प्रभू यांना ढाका विमानतळावरून अटक अशी माहिती इस्कॉन मंदिराने दिली.
शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात चिन्मय प्रभू यांनी आवाज बुलंद केला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. रंगपूर येथे त्यांनी शुक्रवारी एका विशाल सभेला संबोधित केले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार सुरू झाले आहेत. आंदोलनादरम्यान आणि मंदिरांवर हल्ले करण्यात आले होते. बांगलादेशातील खुलना, मेहरपूर येथील इस्कॉन मंदिरांवर हल्ले करण्यात आले होते.
ISKCON's Chinmaya Prabhu arrested चिन्मय प्रभू यांनी मंदिरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. चटगाव येथील तीन मंदिरे धोक्यात आहेत. मात्र, हिंदू समुदायाने काही मुस्लिमांची मदत घेत त्यांचा आतापर्यंत बचाव केला आहे, असे चिन्मय प्रभू यांनी सांगितले होते. समुदायाने पोलिस आणि शीघ्र कृती दलाकडे मदत मागितली होती. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कित्येक हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांना बांगलादेशात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, ते पश्चिम बंगाल आणि त्रिपुराच्या मार्गाने भारतात येत आहेत, असा दावा त्यांनी केला होता.