विलिनस,
Lithuania cargo plane crashed : लिथुआनियाच्या राजधानीजवळ डीएचएलचे मालवाहू विमान एका घरावर कोसळले. या अपघातात एक ठार झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. विमान कोसळल्यानंतर दोन जणांना रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. विमानतळाजवळ असलेल्या दोनमजली घराला विमान धडकले, असे लिथुआनियातील सरकारी माध्यम एलआरटीने दिलेल्या वृत्तात म्हटले.
Lithuania cargo plane crashed : कोसळलेले मालवाहू विमान डीएचएलचे होते आणि ते जर्मनीतील लिपझिग येथून विलिनस येथे जात होते, अशी माहिती लिथुआनिया विमानतळ प्राधिकरणाने दिली. अपघाताची माहिती मिळताच शहर सेवा आणि अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळावर दिसून आले, असे या माध्यमाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले. या अपघाताबाबत जर्मनीतील बॉन येथे मुख्यालय असलेल्या डीएचएलने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त नाही. अपघातग्रस्त बोईंग ७३७ विमान ३१ वर्षे जुने होते. त्याची एअरफ्रेम जुनी असली, तरी मालवाहतुकीसाठी वापरली जाते, असे तज्ज्ञांनी सांगितले.