लोणीचे संत श्री सखाराम महाराज यांची पुण्यतिथी यात्रा

    दिनांक :25-Nov-2024
Total Views |
नागपूर,
Shri Sakharam Maharaj : संतश्रेष्ठ श्री सखाराम महाराज लोणी यांची पुण्यतिथी यात्रा दिनांक २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर बुधवार या कालावधीत लोणी येथे होणार आहे. श्रींची पुण्यतिथी व महापंगत दिनांक ३०/११/२४ ला दुपारी ३ वाजता होईल कार्तिक वद्य चतुर्दशीला श्रींचे श्राद्ध व कार्तिक वद्य अमावस्येला श्रींची पुण्यतिथी महोत्सव व महापंगत असते. मार्गशीर शुद्ध प्रतिपदेला दुपारी रथाची मिरवणूक निघेल यांची सुरुवात शके १८४७ म्हणजे १९२५ पासून सुरू झाली आहे.
 
Shri Sakharam Maharaj Butter
रामकृष्ण मंडलिक यांनी परभणी येथून तीन मजली प्रचंड मोठा रथ तयार केला. त्याचे सुटे भाग २५ बैलगाड्या मधून लोणीस आणले व तेथे रथ उभा केला, हा रथ भक्तगण जगन्नाथ पुरीच्या रथाप्रमाणेच हाताने ओढतात मंदिराभोवती परिक्रमा पूर्ण करतात. रथाचे हे १०० वे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. Shri Sakharam Maharaj त्याच दिवशी रात्री पालखी निघते ही पूर्ण लोणी गावात फिरवल्या जाते. जागोजागी सडा समर्जित करून रांगोळ्या काढतात पालखी बरोबर मशाली असतात व भक्त मंडळींचे कीर्तन भजन सुरू असते रात्रीच्या वेळी हे दृश्य मोठे हृदयांगम असते.
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र