पुन्हा पक्ष फुटीची भीती, ठाकरेंनी घेतले शपथपत्र !

आदित्य ठाकरे विधिमंडळ नेते, भास्कर जाधव गटनेते

    दिनांक :25-Nov-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
मुंबई, 
vidhansabha 2024 नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचे विजयी झालेल्या २० आमदारांची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली. यावेळी त्यांनी पक्ष फुटीच्या भीतीने सर्व निवनिर्वाचित आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतले.मुंबईत मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. यावेळी विधिमंडळ पक्षनेते म्हणून आमदार आदित्य ठाकरेंची एकमताने निवड करण्यात आली. तर, विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची निवड करण्यात आली. पक्षाच्या प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांना कायम ठेवण्यात आले आहे.
 

uddhav thacekrey 
 
vidhansabha 2024 मागिल पक्ष फुटीचा धसका उद्धव ठाकरेंनी चांगलाच घेतला आहे. त्यामुळे यावेळी निवडून आलेले आमदार तरी शेवटपर्यंत कायम रहावे, यासाठी खबरदारीचे पाऊल म्हणून सर्व आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मतमोजणीपूर्वीच मविआच्या तिन्ही घटक पक्षांनी हॉटेलचे बुकींग केले होते. आमदारांना मुंबई थांबविण्याबाबत उपाययोजना केल्या होत्या. मात्र, यावेळी निवडून आलेल्या उबाठाच्या आमदारांना परत मतदारक्षेत्रात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या, त्यानुसार सर्व आमदार परत आपापल्या मतदारसंघात परत गेले.