देव्हाऱ्यातील मूर्तींची उंची किती असावी? पूजा करण्याआधी हे नियम तुम्हाला माहिती असायला हवेयत

    दिनांक :26-Nov-2024
Total Views |
hindu temple हिंदू धर्मात घरच्या देव्हाऱ्याला खूप महत्व असते. ही परंपरा फार जुनी आहे. हिंदु धर्म मानणाऱ्या प्रत्येक घरात तुम्हाला देव्हारा नक्की सापडेल. काही घरात छोटा देव्हारा असतो तर काही घरात मोठा देव्हारा असतो. देव्हाऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या देवाच्या मुर्ती असतात. घराच्या देव्हाऱ्यात ठेवलेल्या मुर्तीचे वास्तु शास्त्रात महत्व आहे. वास्तु शास्त्रानुसार, घरात ठेवण्यात येणाऱ्या देव्हाऱ्याची दिशा आणि मुर्त्यांचा योग्य आकार याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे. देव्हाऱ्यातील देवांची पूजा केल्याने तुमच्या मनाला शांती तर मिळतेच यासोबत ईश्वराच्या पूजेमुळे फळदेखील मिळते. यासाठी, मंदिरात ठेवलेली प्रत्येक वस्तू ही वास्तु नियमांनुसार हवी.
 
 
  
hindu temple
 
 
३ इंचापेक्षा मोठी नसावी मूर्ती
घरच्या देव्हाऱ्यात hindu temple जास्त मोठी मुर्ती ठेवू नये. शास्त्रानुसार, घरच्या देव्हाऱ्यात ठेवल्या जाणाऱ्या देवी-देवतांच्या मुर्तीची उंची ३ इंचापेक्षा मोठी नसावी. तुमच्या अंगठ्याच्या उंचीएवढी मुर्ती असावी. अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराच्या मुर्ती देव्हाऱ्यात नसाव्यात. मोठ्या आकाराच्या मुर्तींची पूजा करताना अनेक नियमांचे पालन करावे लागते. त्यांच्या पूजेत छोटीशी चूकदेखील अशुभ मानली जाते. असे ज्योतिषाचार्य यांनी ही माहिती दिली.
छोटेसे असावे शिवलिंग
काही लोक घरच्या hindu temple देव्हाऱ्यात शिवलिंग ठेवतात. अशावेळी देव्हाऱ्यात ठेवण्यात येणाऱ्या शिवलिंगाचा आकारदेखील आंगठ्याइतका असावा. यापेक्षा मोठे शिवलिंग घरात नसावे. शिवलिंह खूपच संवेदनशिल असते. त्यामुळे, घरच्या देव्हाऱ्यात शिवलिंग ठेवण्याचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहेत.
तुटलेल्या मूर्ती ठेवू नका
घरच्या देव्हाऱ्यात hindu temple कधी तुटलेल्या मुर्ती ठेवू नका. त्या मुर्ती तात्काळ देव्हाऱ्यातून बाहेर काढा. अशा मूर्ती नदीमध्ये सोडा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. देवाचे तुटलेले फोटो किंवा मुर्ती देव्हाऱ्यात असणे अशुभ मानले जाते.

तांब्या-पितळेच्या मूर्ती 'अशा' करा स्वच्छा
तांब्या-पितळेची hindu temple भांडी किंवा मूर्ती स्वच्छ करण्यासाठी व नव्यासारखी चमकवण्यासाठी काही सोप्पे उपाय सांगणार आहोत. ज्यामुळं, तांबा व पितळेच्या मूर्ती लख्ख चमकतील. लिंबू व मीठाचा वापर धातुच्या वस्तु साफ करण्यासाठी पारंपारिक उपाय आहे. एक लिंबू कापून त्यावर थोडेसे मीठ टाका. आता या लिंबाच्या फोडीने तांबा आणि पितळेच्या मूर्तीवर घासून काढा. लिंबात असलेले अॅसिडी धातुंवर साचलेला मळ हटवण्यास मदत करते. तर मीठ स्क्रबरप्रमाणे काम करते. यानंतर मूर्ती कोमट पाण्याने साफ करुन एका कपड्याने पुसून घ्या. व्हिनेगर व बेकिंग सोडा याचे मिश्रण तांबे आणि पितळेच्या मूर्ती साफ करा. एका वाटीत एक चमचा बेकिंग सोडा आणि त्यात थोडं व्हिनेगर टाका. आता हे मिश्रण मूर्तीला लावून हातांनी स्क्रब करा. यामुळं, मूर्तीवर साचलेला मळ स्वच्छ होईल आणि चमक येईल. टोमॅटोचा रसदेखील एक क्लिनिंग एजंट म्हणून काम करते. टोमॅटोचा रस तांबा, पितळेच्या मूर्तीवर लावा आणि काहीवेळ तसंच ठेवून द्या. त्यानंतर, साधा कपड्याने मूर्ती साफ करा आणि पाण्याने धुवून घ्या. बेसन आणि हळद याचे मिश्रण तांबे व पितळेच्या मूर्तीवर लावा हा एक चांगला पर्याय आहे. याची पेस्ट बनवून मूर्तीला लावून घ्या काही वेळ सुकल्यानंतर स्क्रबकरुन पाण्याने धुवून घ्या. मूर्ती एकदम स्वच्छ होतील. कोल्डड्रिंकमध्येही तांबा, पितळेची भांडी घासून स्वच्छ होतात. मूर्ती थोड्यावेळासाठी कोल्डड्रिंकमध्ये ठेवून द्या आणि साफ कपड्याने धुवून घ्या. यामुळं, मुर्त्या स्वच्छ होतात.