सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

    दिनांक :27-Nov-2024
Total Views |
पुणे, 
CET Schedule : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी घेतल्या जाणार्‍या प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) जाहीर केले. त्यानुसार अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची एमएचटी-सीईटी ९ ते २७ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे.
 
 
cet
 
CET Schedule : ९ ते १७ एप्रिल या कालावधीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) या गटासाठीची, तर १९ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीबी) गटासाठीची परीक्षा घेतली जाणार आहे. डीपीएन-पीएचएन अभ्यासक्रमासाठीची सीईटी ८ एप्रिल, (नर्सिंग) अभ्यासक्रमासाठीची सीईटी ७ आणि ८ एप्रिल रोजी होणार आहे.
 

CET Schedule : बीबीए, बीबीएम, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांसाठीची सीईटी १ ते ३ एप्रिल या कालावधीत, डिझाइन पदवी (बी.डिझाइन) अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा २९ मार्च रोजी घेतली जाणार आहे. बीए. बीएड, बीएस्सी. बीएस वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम, बीएड. एमएड तीन वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट पदवी अभ्यासक्रमासाठीची सीईटी २८ मार्च रोजी होणार आहे. शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठीची सीईटी २७ मार्च रोजी, बीएड. (जनरल अँड स्पेशल) बीएड एलसीटी अभ्यासक्रमासाठीची सीईटी २३ ते २५ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येणार एमसीए अभ्यासक्रमासाठीची सीईटी २३ मार्च, तीन वर्षे मुदतीच्या विधी अभ्यासक्रमासाठीची २० आणि २१ मार्च रोजी, एमबीए एमएमएस सीईटी १७ ते १९ मार्च, शारीरिक शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी, शिक्षणशास्त्र पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी १६ मार्च होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.