पक्ष पदाधिकारी ऐन निवडणुकीत सोडून गेले, सर्वसामान्य जनता भाजपा सोबत

    दिनांक :27-Nov-2024
Total Views |
मानोरा,
vidhansabha results 2024 तालुक्यातील कुपटा व आसोला या दोन्ही व ईतरही जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजप पक्षाला मताधिय मिळाल्याने कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे. कुपटा हा सर्कल भाजपाचा बालेकिल्ला असून, येथून निवडून गेलेले सदस्य हे जिप मधे गटनेते म्हणून भूमिका वठवीत असताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत प्रचारापासून अलिप्त भूमिका निभवत विधानसभा उघडपने तुतारीचा प्रचार केल्याचे बोलले जाते.
 

maharashtra assembly results
 
 
vidhansabha results 2024 जि.प. सर्कल मधील पक्ष पदाधिकार्‍यांनी साथ सोडली तरीही कुपटा येथून सई डाहाके यांना सामान्य कार्यकर्त्याची साथ मिळाली असून, आता आगामी जि.प., पं. स.चे संभाव्य उमेदवार हा आमदाराच्या मर्जीतील असेल कसे बोलल्या जात आहे. कुपटा भाजपाचा बालेकिल्ला व आसोला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. या दोन्ही सर्कलमध्ये नवनिर्वाचित आमदारांना मताची आघाडी मिळाल्याने येथे भाजपच्या उमेदवारी साठी भाऊगर्दी होणार असून कुपटा खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष महादेव ठाकरे, माजी सरपंच दिलीप चव्हाण व राष्ट्रवादी कडून माजी पं.स. उपसभापती अभिजीत पाटील हे मोठ्या जोमाने तयारी करीत आहेत. आरक्षणाचा प्रश्न सुटला तर येथे माजी जि.प. सभापती हेमेंद्र ठाकरे हे सुद्धा वेळेवर एन्ट्री घेऊ शकतात. आसोला सर्कलमधून भाजप कार्यकर्ते मोठ्या उत्साहात असून येथून माजी सरपंच देवराव पाटणकर हेही मागील वर्षभरापासून तयारीला लागले आहेत. कोंडोली या सर्कलमध्ये दिग्गज उमेदवारांची धुरळा उडणार असून, जनसामान्याच्या प्रश्नासाठी लढा उभारणारे व शेतकर्‍यांचे कार्यकर्ते म्हणून परिचित मनोहर राठोड हे येथून लढणार आहेत. खरेदी-विक्रीचे अध्यक्ष विक्रांत देशमुख,राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष यशवंत इंगळे, पं.स.चे गटनेते गोपाल भोयर, भाजपाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल पाटील, माजी सरपंच महेश पाटील, बाजार समितीचे संचालक सुनील जामदार आदी दिग्गज उमेदवार कोंडोली जि. प.सर्कल मधून भाग्य आजमावण्यासाठी रणांगणात उतरण्याची शयता आहे. विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षाच्या विरोधात काम करणार्‍या तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य यांना पक्षातून निलंबित केल्याने आता मानोरा तालुयात भाजपाचे तळागाळातील कार्यकर्त्यांना पक्ष न्याय देईल, असे बोलले जात आहे. मागील निवडणुकीत कुपटा सर्कलमध्ये काँग्रेसकडून लढलेले दिलीप चव्हाण हे दोन नंबरचे मते घेऊन पराजित झाले होते ते सुद्धा यावेळी आपले भाग्य आजमावणार आहेत.